सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर! आंबोलीत पुन्हा काळ्या रंगाचा बिबट्या दिसला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 26, 2023 01:37 PM2023-08-26T13:37:56+5:302023-08-26T13:39:42+5:30

जैवविविधता पुन्हा अधोरेखित; काही वर्षांपूर्वी आंबोली येथील वसंत ओगले यांना सुद्धा चौकुळ या रस्त्यावर काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते.

A black leopard was seen in Amboli; The distinct identity of Amboli in the entire Western Ghats still survives today | सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर! आंबोलीत पुन्हा काळ्या रंगाचा बिबट्या दिसला

सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर! आंबोलीत पुन्हा काळ्या रंगाचा बिबट्या दिसला

googlenewsNext

आंबोली (सिंधुदुर्ग) : संपूर्ण पश्चिम घाटामध्ये आंबोलीतील जैवविविधता अतिशय संपन्न समजली जाते. हत्ती, वाघ, बिबटेआणि दुर्मिळ पशुपक्षी,  बेडूक, साप असे सर्व एकत्र सापडणार जैवविविधतेने संपन्न असलेले ठिकाण म्हणजे आंबोली.
 
आता याच आंबोलीमध्ये  गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले.  कोल्हापूर येथील मिलिंद गडकरी  यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तत्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे. तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांना सुद्धा याबाबत कल्पना दिली आहे.

 काही वर्षांपूर्वी आंबोली येथील वसंत ओगले यांना सुद्धा चौकुळ या रस्त्यावर काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो. मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात.

Web Title: A black leopard was seen in Amboli; The distinct identity of Amboli in the entire Western Ghats still survives today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.