शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

By सुधीर राणे | Published: September 24, 2022 12:16 PM2022-09-24T12:16:25+5:302022-09-24T12:23:55+5:30

दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल

A case has been filed against the Shiv Sainiks who cheered as soon as Dussehra gathering was allowed in Kankavli | शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Next

कणकवली : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर काल, शुक्रवारी फटाके लावून घोषणाबाजी व जल्लोष करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यात शिवसेनेचे नगरसेवक कन्हैया पारकर, नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रामदास विखाळे, ऍड. हर्षद गावडे, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी येत घोषणाबाजी करणे, फटाके लावणे व यातून मनाई आदेशाचा भंग करणे यामुळे हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच कणकवलीत शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मनाई आदेश असताना अशाप्रकारे घोषणाबाजी करणे किंवा फटाके वाजवणे हा मनाई आदेशाचा भंग आहे. जर आमच्यावर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ शकतात मग हे गुन्हे का दाखल झाले नाहीत? असा सवाल शिंदे गटाचे कार्यकर्ते सुनील पारकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. आज, शनिवारी सकाळपर्यंत जर गुन्हे दाखल नाही झाले तर कणकवली पोलिसांकडे निवेदन देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. मात्र, तत्पूर्वीच रात्री उशिरा शिवसैनिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: A case has been filed against the Shiv Sainiks who cheered as soon as Dussehra gathering was allowed in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.