रेल्वेत नोकरीच्या आमिषाने २४ लाख १५ हजार उकळले, भांडुप येथील तरुणाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:14 PM2024-04-15T12:14:28+5:302024-04-15T12:15:11+5:30
ओरोस (जि. सिंधुदुर्ग ) : रेल्वे विभागात नोकरीला लावतो असे सांगून रक्कम लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल २४ ...
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : रेल्वे विभागात नोकरीला लावतो असे सांगून रक्कम लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल २४ लाख १५ हजार रुपयांची रक्कम उकळली; मात्र नोकरीला न लावल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार चंद्रसेन गोपाळ गोसावी (६१, रा. गोसावीवाडी, कळसुली, कणकवली) यांनी सिंधुदुर्गनगरीपोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी प्रशांत दाजी राणे (४०, रा. भांडुप- पूर्व) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी प्रशांत दाजी राणे यांनी तक्रारदार चंद्रसेन गोपाळ गोसावी यांचा मुलगा विपुल यास रेल्वेमध्ये नोकरी लावतो. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे असल्याचे सांगून तुमच्या मुलाला नोकरीसाठी प्रयत्न करतो असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्याकडून बँकेच्या अकाउंट नंबरवर पैशाचे व्यवहार करण्यात आले; मात्र रक्कम देऊनही संशयित आरोपींनी तक्रारदार गोसावी यांच्या मुलाला नोकरी लावलेली नाही.