Sindhudurg: दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत घालणे आले अंगलट, गोव्यातील चौघांवर गुन्हा दाखल
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 29, 2024 07:06 PM2024-07-29T19:06:18+5:302024-07-29T19:07:40+5:30
वैभव साळकर दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत तैनात असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गोव्यातील चार जणांवर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
वैभव साळकर
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत तैनात असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गोव्यातील चार जणांवर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अमर अनिल किनळकर (३८, रा. नेरूळ, कांदोळी), संदेश गणपती बामणे ( २०, रा. नेरूळ, कांदोळी), साईराज अमरदीप नाईक (२४, रा. नेरूळ, कांदोळी) व लहू नागप्पा पाटील (२१, रा. म्हापसा) गोवा अशी त्यांची नावे असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता मद्यप्राशन केला असल्याचा वैद्यकीय अहवाल आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
याबाबत दोडामार्ग पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, गोव्यातील अमर, संदेश, साईराज व लहू हे चौघेही त्यांच्या अल्टो के१० या कारने आयी रोडवरून दोडामार्ग बाजारपेठेमध्ये आले होते. त्यांच्या गाडीमुळे वाहतुकीस अडथळा येऊ लागल्याने पिंपळेश्वर चौकात तैनात असलेले पोलिस विजय जाधव यांनी कार बाजूला घेण्यास सांगितले व वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली.
अंमली पदार्थ्यांचे सेवन
दरम्यान चालक व अन्य व्यक्ती कारमधून उतरले व पोलिसांची हुज्जत घालू लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना गाडीत बसा, असे सांगितले. मात्र तरीही यांनी हुज्जत घालणे सुरूच ठेवल्याने जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत यांना कळविले. आशिष भगत व अन्य पोलिसांनी ताबडतोब कारमधील संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचा वैद्यकीय अहवाल आला. चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २८५, २२१, ३(५), एमव्ही ॲक्ट १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.