ओरोस येथे निरंजन डावखरे यांची सोनार समाजाने घेतली भेट, कोकणातील पदवीधरांच्या प्रश्नांबाबत चर्चा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 14, 2024 05:15 PM2024-05-14T17:15:26+5:302024-05-14T17:15:50+5:30
सोनार समाजातील २५०० हून अधिक पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे
नीकेत पावसकर
तळेरे : कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना सोमवारी ओरोस येथे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची सोनार समाजाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुंबई डिस्ट्रिक हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक आणि दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख विशाल कडणे यांच्यासोबत गणेश तळगावकर, चिंतामणी कल्याणकर, संकेत महाडिक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत व विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी कोकणातील रोजगार, स्वयंरोजगार, पदवीधरांचे विविध प्रश्न इत्यादी विषयावर चर्चा झाली.
सोनार समाजाचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये मोठे वर्चस्व असून समाजाचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली सोनार समाजातील २५०० हून अधिक पदवीधर मतदारांनी १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे. भेटी दरम्यान समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आमदार डावखरे यांना शुभेच्छा दिल्या.