Sindhudurg: मासेमारीसाठी गेलेली नौका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकावर आदळली, खलाशांना वाचविण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:59 PM2024-08-07T13:59:30+5:302024-08-07T13:59:51+5:30

लाखोंचे नुकसान

A fishing boat hit a rock due to gusty winds in Malvan Surjekot coastal, the sailors were rescued  | Sindhudurg: मासेमारीसाठी गेलेली नौका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकावर आदळली, खलाशांना वाचविण्यात यश 

Sindhudurg: मासेमारीसाठी गेलेली नौका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकावर आदळली, खलाशांना वाचविण्यात यश 

मालवण : मालवण बंदराजवळील सर्जेकोट समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकाळ भागात आदळून नुकसानग्रस्त झाली. त्यात नौकेचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जाळी, इंजिन आणि इतर साहित्य समुद्रात वाहून गेले आहे. नौकेचे मालक मच्छीमार राजेश शेलटकर यांचे मोठे नुकसान झाले असून, सर्जेकोट बांद येथील खडकाळ भागात ही घटना घडली आहे. बोटीवर चार खलाशी होते, त्यांना वाचविण्यात मात्र यश आले आहे.

मंगळवारी पहाटे ही नौका मासेमारीसाठी गेली असता ही दुर्घटना घडली आहे. सर्जेकोट बंदरात मार्गदर्शन दिवा नसल्यामुळे मासेमारीस गेलेल्या नौका दुर्घटनाग्रस्त होत असल्याचे दिसून आले आहे. सर्जेकोट बंदरात मार्गदर्शक दिवा उभारण्यात यावा, अशी येथील मच्छीमारांची मागणी आहे. रात्रीच्या वेळी किंवा पहाटे अंधुक प्रकाशात किनाऱ्याजवळ येण्याचा मार्ग समजत नसल्यामुळे आतापर्यंत वर्षभरात चार नौका भरकटल्यामुळे दुर्घटनाग्रस्त झाल्या असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

Web Title: A fishing boat hit a rock due to gusty winds in Malvan Surjekot coastal, the sailors were rescued 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.