Sindhudurg: गव्यांचा कळप आडवा आला, अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 14, 2024 18:26 IST2024-02-14T18:25:57+5:302024-02-14T18:26:53+5:30
भुदरगड येथून गोव्याकडे जाताना झाला अपघातात

Sindhudurg: गव्यांचा कळप आडवा आला, अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला
आंबोली (सिंधुदुर्ग) : गव्यांचा कळप अचानक गाडीच्या आल्याने झाल्याने अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. स्वप्निल श्यामराव कांबळे (वय-२९) असे जखमीचे नाव आहे. सुदैवाने स्वप्निल यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने गंभीर दुखापत झाली नाही. आंबोली फणसवाडी येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
स्वप्निल हा गोवा येथे आरोग्य विभागामध्ये १०८ ॲम्बुलन्सवर कार्यरत आहे. तो भुदरगड या आपल्या गावाहून दुचाकीने गोव्याकडे निघाला होता. आंबोली फणसवाडी येथे त्याच्या दुचाकीच्या समोर गव्याचा कळप आला. यातील एका गव्याचे शिंग त्याच्या गाडीच्या पुढील चाकामध्ये अडकले गेल्याने गाडी तशीच फरपटत झाळकटीमध्ये घेऊन गेला. अपघातात स्वप्निल हा किरकोळ जखमी झाला.
सुदैवाने स्वप्निल यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती स्थानिकांना मिळताच स्थानिकांनी तत्काळ स्वप्निल याला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. त्वरित वनविभागाचे कर्मचारी व वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. अधिक उपचारासाठी स्वप्निल याला रुग्णालयात दाखल केले.