फोंडाघाट परिसरात फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:06 PM2023-11-07T13:06:30+5:302023-11-07T13:06:59+5:30

कणकवली: फोंडाघाट हवेलीनगर तसेच कुर्ली वसाहत, लोरे - फोंडाघाट एरिगेशन कॉलनी या परिसरात गेले काही दिवस एक बिबट्या फिरताना ...

A leopard roaming in the Fondaghat area has finally been jailed | फोंडाघाट परिसरात फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद 

फोंडाघाट परिसरात फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद 

कणकवली: फोंडाघाट हवेलीनगर तसेच कुर्ली वसाहत, लोरे - फोंडाघाट एरिगेशन कॉलनी या परिसरात गेले काही दिवस एक बिबट्या फिरताना अनेक नागरिकांनी पाहिला होता. तो बिबट्या घोणसरी गावातील टेंबवाडी येथील जंगलमय भागात फासकीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला.  

वनरक्षक पाटील यांनी कणकवली येथील वनपरीक्षेत्र अधिकारी यांना त्याबाबत कळविले. त्यानंतर तातडीने  रेसक्यू पथकांने घटनास्थळी जाऊन त्या मादी बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने जेरबंद केले. यामुळे मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असणाऱ्या फोंडाघाट परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

यावेळी घटनास्थळी पोचलेल्या वनपरीक्षेत्र अधिकारी अमित कटके यांनी कोणताही वन्य प्राणी फासकी मध्ये अडकला असेल किंवा विहिरीत पडलेला आढळ्यास ग्रामस्थानी तातडीने वनविभाग कर्मचाऱ्यांना कळवावे.  त्यामुळे त्या जखमी वन्य प्राण्यांना पकडून त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवता येईल.असे आवाहन यावेळी तेथील ग्रामस्थांना केले.

सावंतवाडीचे उपवनरक्षक  एस.एन. रेड्डी, वन्य जिवरक्षक नागेश दप्तरदार , सावंतवाडी सहाय्यक वनरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनक्षेत्रपाल अमित कटके, फोंडाघाट वनपाल कोळेकर, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट , देवगड वनपाल सारिक फकीर , वनपाल नागेश घोराटे, वनरक्षक अतुल पाटील ,अतुल खोत , वनसेवक बागवे, लाड, प्रकाश राणे व घोणसरी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

Web Title: A leopard roaming in the Fondaghat area has finally been jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.