Sindhudurg: कारची दुभाजकाला धडक, अपघातात पोलिस कर्मचारी ठार
By सुधीर राणे | Updated: June 22, 2024 15:44 IST2024-06-22T15:41:36+5:302024-06-22T15:44:48+5:30
कणकवली : ओरोस येथून वैभववाडी येथे घरी परतताना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावर धडकली. या ...

Sindhudurg: कारची दुभाजकाला धडक, अपघातात पोलिस कर्मचारी ठार
कणकवली : ओरोस येथून वैभववाडी येथे घरी परतताना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावर धडकली. या अपघातातपोलिस कर्मचारी यशवंत उर्फ अभिजीत तांबे (वय ३५) यांचा मृत्यू झाला.
वैभववाडी तालुक्यातील वाभवे, तांबेवाडी येथील रहिवासी आणि सिंधुदुर्ग पोलिस सेवेतील कर्मचारी यशवंत उर्फ अभिजीत भास्कर तांबे ओरोस येथून वैभववाडी येथे घरी परतताना मुंबई- गोवा महामार्गावर नांदगाव येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. कार महामार्गाच्या दुभाजकावर धडकली.
अपघातात अभिजीत तांबे यांचा मृत्यू झाला. तर दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिस आणि वाहतूक पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.