सेवा बजावत असतनाच पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By अनंत खं.जाधव | Published: March 10, 2024 03:46 PM2024-03-10T15:46:49+5:302024-03-10T15:47:06+5:30
आंबोली पोलिस दुरक्षेत्रावरील घटना, पोलिस दलात हळहळ
सावंतवाडी : सावंतवाडीपोलिस ठाण्या अर्तगत येत असलेल्या आंबोली पोलिस दुरक्षेत्रावरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश रघुनाथ दुधवडकर (54 रा.सालईवाडा सावंतवाडी) याचा पोलिस सेवा बजावत असतना रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने पोलिस दलात एकच हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेनंतर जगदीश दुधवडकर याचा मृतदेह सावंतवाडीत आणण्यात आला असून दुपारनंतर त्याच्या मुळ गावी हलविण्यात येणार आहे.
सावंतवाडी पोलिस ठाण्या अर्तगत येत असलेल्या आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर जगदीश दुधवडकर हे गेली वर्षभर कार्यरत होते.शनिवारी रात्री त्यानी आपले दैनंदिन कामकाज संपवून झोपी गेले होते. त्यानंतर सकाळी उठून आपले दैनंदिन कामकाज करण्यासाठी तयारी करत असतनाच त्याना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले त्याना पुढील उपचारार्थ आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यापूर्वी च त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सोबत असलेले कर्मचारी चांगलेच हादरून गेले होते.
दुधवडकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते.नंतर ते काहि काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते अलिकडेच एक वर्षापासून आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर सेवा बजावत होते. अशातच रविवारी सकाळी झोपून उठल्यानंतर ते दुरक्षेत्राच्या आवारात झाडू मारत असतनाच अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.आणि ते खाली कोसळले.
ही घटना कार्यरत असलेल्या इतर पोलिस कर्मचारी यांनी बघितली आणि लागलीच आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.पण दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात कळविण्यात आली त्यानंतर पोलिस यंत्रणाही चांगलीच हादरून गेली अनेकांना अश्रू अनावर झाले.पोलिस अधिकारी आंबोली कडे रवाना झाले.व दुधवडकर याचा मृतदेह आंबोली येथून सावंतवाडीत कुटीर रुग्णालयात आणण्यात आला.घटनेची माहिती मिळताच ओरोस येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सावंतवाडी रूग्णालयात धाव घेतली दुधवडकर याच्या पत्नीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.दुपारनंतर दुधवडकर याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी कुडाळ तालुक्यातील कर्ली येथे हलविण्यात येणार आहे.