विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, सिंधुदुर्गातील निरवडेत घडली दुर्दैवी घटना

By अनंत खं.जाधव | Published: March 4, 2023 02:14 PM2023-03-04T14:14:04+5:302023-03-04T14:14:29+5:30

सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

A school boy died after falling into a well, an unfortunate incident at Nirwad in Sindhudurga | विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, सिंधुदुर्गातील निरवडेत घडली दुर्दैवी घटना

संग्रहीत छाया

googlenewsNext

सावंतवाडी : काम सुरू असलेल्या विहिरीत पडून निरवडे-भंडारवाडी येथील आरव जानू खरात (वय-९) या  शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज, शनिवारी (दि.४) सकाळच्या सुमारास घडली. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तो तत्पुर्वीच मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी तथा बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आरव हा सकाळी शाळेतून घरी आला. त्यानंतर घरात दप्तर ठेवून आईला खेळायला जातो असे सांगून निघून गेला. यावेळी घरापासून काही अंतरावर विहीर खुदाईचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून जात असताना तो पाय घसरून विहिरीत कोसळला. दरम्यान त्याच्यासोबत असलेले सहकारी ही घटना सांगण्यासाठी त्याच्या घरी धावून गेले. 

यावेळी घरातील व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला तात्काळ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 

मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने निरवडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: A school boy died after falling into a well, an unfortunate incident at Nirwad in Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.