Sindhudurg: भरधाव दुचाकीची कारला धडक, आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:48 AM2024-06-19T11:48:33+5:302024-06-19T11:49:20+5:30

आंबोली : आंबोली नांगरतास फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची गोवा येऊन गुजरात येथे जात असलेल्या बोलेरो गाडीला जोरदार ...

A speeding two-wheeler collided with a car, two people who came for tourism in Amboli died | Sindhudurg: भरधाव दुचाकीची कारला धडक, आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू

Sindhudurg: भरधाव दुचाकीची कारला धडक, आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू

आंबोली : आंबोली नांगरतास फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची गोवा येऊन गुजरात येथे जात असलेल्या बोलेरो गाडीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील सादिक इम्तियाज मुल्ला (१९) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तय्यब सुलतान साप उसपघाला हा गंभीर जखमी झाला आहे. 

दुचाकीवर तिघे जण स्वार होते. त्यातला एक घाबरून पळून गेला. हे तिघे जण आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आले होते. तय्यब सुलतान साप उसपघाला हा गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. मात्र त्याचाही मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

बोलेरो गाडी ही गोवा होऊन गुजरात येथे जात असताना उलट्या बाजूने येत दुचाकीने या बोलेरो गाडीला धडक दिली. दुचाकी क्रमांक (केए ४९ क्यू ४८२९) घेऊन हे तरुण आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आले होते. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. ते सायंकाळी उशिरापर्यंत आंबोली येथे पोहोचून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेणार आहेत. अधिक तपास आंबोली पोलिस कॉन्स्टेबल मनीष शिंदे, तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल पिरंकर करत आहेत.

Web Title: A speeding two-wheeler collided with a car, two people who came for tourism in Amboli died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.