Sindhudurg: प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल

By सुधीर राणे | Published: February 1, 2024 04:22 PM2024-02-01T16:22:10+5:302024-02-01T16:24:53+5:30

पीडित शाळकरी मुलीच्या पालकांकडून तक्रार दाखल

A student was beaten up for not answering the question, a case was filed against the teacher in Kankavali | Sindhudurg: प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल

Sindhudurg: प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल

कणकवली: कणकवली तालुक्यातील कसवण येथील शाळा क्रमांक २ मधील एका तिसरी इयत्तेतील १० वर्षीय शाळकरी मुलीला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षक किशोर बाळकृष्ण गोसावी याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित शाळकरी मुलीला शाळेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे शिक्षक किशोर गोसावी याने त्या पीडित मुलीच्या पायावर व पाठीवर लाकडी छडीने मारहाण केली. अशी तक्रार त्या पीडित मुलीच्या पालकांनी दिली आहे. ही घटना काल, बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी घडल्याचे म्हटले आहे. 

दाखल तक्रारीनुसार संशयित आरोपी किशोर गोसावी याच्या विरोधात भादवी ३२४ व अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ चे कलम ७५ व ८२ नुसार कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालक वर्गात देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर शिक्षण विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Web Title: A student was beaten up for not answering the question, a case was filed against the teacher in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.