झाडावर आदळून पर्यटकांची कार उलटली, बांदा-आंबोली मार्गावर विलवडेत झाला अपघात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 17, 2022 12:58 PM2022-09-17T12:58:45+5:302022-09-17T12:59:33+5:30
पर्यटकांना गोव्याकडे जाताना आंबोली घाट हा महत्त्वाचा आहे. संततधार पावसामुळे घाटरस्त्याची वाताहात
बांदा (सिंधुदुर्ग) : बांदा-आंबोली मार्गावर विलवडे चव्हाटवाडी येथे भरधाव वेगात पर्यटकांची आलिशान मोटार कार फणसाच्या झाडावर आदळून अपघातग्रस्त झाली. गाडी वेगात असल्याने पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली. सुदैवाने कार मधील कुणालाही दुखापत झाली नाही. प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार हे पर्यटक पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते गोव्याला पर्यटनासाठी जात होते.
पर्यटकांना गोव्याकडे जाताना आंबोली घाट हा महत्त्वाचा आहे. संततधार पावसामुळे घाटरस्त्याची वाताहात झाली आहे. आंबोली घाट उतरून दाणोली विलवडे मार्गे बांदा हा गोव्याकडे जाणारा शॉर्ट कट असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रहदारी असते. त्यातच हा रस्ता त्यामानाने खूप छोटा असल्याने वाहनधारकांना साईडपट्टीचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात होतच असतात. भविष्यात हे अपघात रोखण्यासाठी या मार्गावर फलक लावणे, रस्ता रूंदीकरण करणे गरजेचे आहे.