वेंगुर्ला द्वीपसमूहात स्विफ्टलेफ्टची मोठी विण वसाहत; सॅकॉनचे शास्त्रज्ञ सादर करणार संवर्धन आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 06:46 PM2024-01-21T18:46:51+5:302024-01-21T18:47:03+5:30

जगभरात इंडीयन स्विफ्टलेट पक्षाच्या १३ विण वसाहती आहेत.

A weaver colony of Swiftleft in the Vengurla Archipelago Conservation plan to be presented by Sacon scientists | वेंगुर्ला द्वीपसमूहात स्विफ्टलेफ्टची मोठी विण वसाहत; सॅकॉनचे शास्त्रज्ञ सादर करणार संवर्धन आराखडा

वेंगुर्ला द्वीपसमूहात स्विफ्टलेफ्टची मोठी विण वसाहत; सॅकॉनचे शास्त्रज्ञ सादर करणार संवर्धन आराखडा

संदीप बोडवे

मालवण: वेंगुर्ला द्वीप समूहातील बर्न्ड आयलँड बेटावरील गुहेत असलेल्या भारतीय पाकोळी (इंडीयन स्विफ्टलेट) या पक्षाच्या जगातील सर्वात मोठ्या विण वसाहतीचे संवर्धन करण्यासाठी सॅकॉनचे शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहेत. त्यांनी याबाबतचा संवर्धन आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून लवकरच हा आरखडा भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे. सॅकॉनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोल्डिन क्वार्ड्रोज, डॉ. शिरीष मंचि यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक धनुषा कावलकर या एका प्रकल्पाअंतर्गत २०२० पासून महाराष्ट्रातील भारतीय पाकोळी पक्षांच्या वसाहतींचे संशोधन करत आहेत. 

जगातील सर्वात मोठी वसाहत...जगभरात इंडीयन स्विफ्टलेट पक्षाच्या १३ विण वसाहती आहेत. त्या पैकी भारतात तामिळनाडू, केरला व महाराष्ट्रात या पक्षांच्या ६ वसाहती असून वेंगुर्ले दीप समूहातील बर्न्ड आयलँड या बेटावर भारतीय पाकोळी ची जगातील सर्वात मोठी विण वसाहत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. भारता व्यतिरिक्त श्रीलंकेत या प्रजातीची वसाहत आढळते.

गुहेत पाच ते सहा हजार पक्षांचे वास्तव्य... बर्न्ड आयलँड बेटावरील गुहेत पाच ते सहा हजार पक्षी वास्तव्य करून आहेत. या गुहेची लांबी ६१ मिटर व उंची १८ मिटर असून भारतीय पाकोळीच्या वसाहतीने ही गुहा भरली आहे. तिची अधिकचे पक्षी वास्तव्य सामावण्याची क्षमता संपली आहे. या मुळे येथीलच ओल्ड लाईट हाऊस या बेटावर भारतीय पाकोळी पक्षाने आपली दुसरी वसाहत तयार केली आहे. 

वैशिष्ट्य पूर्ण पक्षी...
भारतीय पाकोळी एक पत्नी व्रत असतात. त्यांचे पाय कमजोर असल्याने त्यांना एपोडेडी म्हणतात. ते कधीही जमिनीवर उतरत नाहीत. त्यांचे पंजे मजबूत असल्याने ते लटकू शकतात. हवेतल्या हवेत तरंगत असल्याने त्यांना एरोडायनामिक पक्षी म्हणून ओळखतात. अमेरिकेतील ऑईल बर्ड या एकमेव पक्षाप्रमाणे अंधारात प्रवास करून आपले मूळ स्थान शोधण्याची त्यांना कला अवगत आहे. 

लाळे पासून घरटे.....
भारतीय पाकोळी पक्षी आपली घरटी त्यांच्या लाळे पासून बनवितात. १० ग्राम वजनाचा पक्षी १० ग्राम लाळ उत्सर्जित करून आपले घरटे बनवितात. याला ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागतो. हवेत उडणारे कीटक हे त्यांचे खाद्य आहे.

Web Title: A weaver colony of Swiftleft in the Vengurla Archipelago Conservation plan to be presented by Sacon scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.