Sindhudurg News: अपघातात वागदेतील युवक जागीच ठार
By सुधीर राणे | Published: August 14, 2023 12:46 PM2023-08-14T12:46:31+5:302023-08-14T12:47:01+5:30
कणकवली: जानवलीहून वागदेच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर मनोहर शिल्प बिल्डिंग समोर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार ...
कणकवली: जानवलीहून वागदेच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर मनोहर शिल्प बिल्डिंग समोर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार गणेश उदय काणेकर(१८) हा जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
गणेश हा जानवली येथून वागदेच्या दिशेने दुचाकीने जात होता. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी स्पष्ट झाले नसले, तरी ज्या ठिकाणी दुचाकीवरून गणेश रस्त्यावर पडला तेथून त्याची दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली होती. त्यामुळे तो वेगात असण्याची शक्यता पोलिसानी वर्तवली आहे. यात गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गणेशला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वी त्याचा मृत्यु झाला होता.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, मिलिंद देसाई यांच्यासह अन्य स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वागदे येथील ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. कणकवली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.