आरती सरवणकर विद्यापीठात चौथी !
By admin | Published: August 7, 2015 10:35 PM2015-08-07T22:35:14+5:302015-08-07T22:35:14+5:30
कोकणचा झेंडा : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
देवरूख : मुंबई विद्यापीठ अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील आॅटोमोबाईल शाखेच्या ३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. याहीवर्षी सर्वच विभागांमध्ये महाविद्यालयाचे निकाल हे विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत. यावर्षी महाविद्यालयाच्या आॅटोमोबाईल विभागातून आरती सरवणकर ही विद्यार्थिनी ७५.३८ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह विद्यापीठात चौथी आली. प्रशील गिर्डे व विनय सरदेसाई ह्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ७४.३४ टक्के आणि ७३.७९ टक्के गुण मिळवून आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत अनुक्रमे ८वा व १०वा क्रमांक पटकावला. माहिती तंत्रज्ञान या शाखेचा महाविद्यालाचा निकाल १०० टक्के लागला असून, कौस्तुभ मडकइकर हा ७४.६० टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम आला. रुपाली लोकम आणि स्नेहल नाईक ह्यांनी अनुक्रमे ७२.७३ टक्के व ७२.४६ टक्के गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. संगणक विभागाचा निकाल ९८.६६ टक्के लागला असून, अंकिता चिखले, विपूल गुरव आणि अंकिता बोभाटे हे अनुक्रमे ७३.४६ टक्के, ७३.२० टक्के व ७२.८० टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
अणुविद्युत व दूरसंचार विभागाचा निकाल ८८.४६ टक्के लागला असून, गणेश मोरे, संजीवनी सनगरे आणि मंदाकिनी सावंत हे अनुक्रमे ७५.३५ टक्के, ७२.२५ टक्के व ७१.९३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
यांत्रिकी विभागाचा निकाल ७५.०० लागला असून, संतोष बारदेस्कर, राजेंद्र वेलकर आणि स्वानंद जोशी हे अनुक्रमे ७४.१३ टक्के, ७३.७३ टक्के व ७१.०६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयातील सर्व विभागांमधून एकूण ३४५ विध्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ४८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर १६८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
संस्थाध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, चंद्रकांत यादव, दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व प्राध्यापकांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.