अबब ! दोन कोटींचा दंड
By admin | Published: February 11, 2015 10:53 PM2015-02-11T22:53:41+5:302015-02-12T00:32:20+5:30
अवैध उत्खनन आणि वाहतूक : एकाच महिन्यात कारवाई
रत्नागिरी : गौण खनिजांच्या अवैध उत्खननप्रकरणी जिल्हा खनिकर्म विभागाने जानेवारी महिन्यात धडक कारवाई करत २ कोटी २१ लाखांचा दंड वसूल केला आहे. चार उपविभागात रत्नागिरी अव्वल असून यांपैकी २ कोटी ११ लाखांची वसुली या उपविभागाने केली आहे. अवैध वाहतुकीप्रकरणी १३ लाख २६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षातील ही मोठी कारवाई आहे.
या आर्थिक वर्षात गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भुपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला ६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरील कारवाईपोटी आत्तापर्यंत ३ कोटी १७ लाख ५१ हजार इतकी वसुली झाली आहे.
यातील २ कोटी ३४ लाख २६ हजार इतका दंड केवळ अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरील कारवाईतून मिळालेला आहे. रत्नागिरी उपविभागानेच यापैकी २ कोटी ११ लाख ७५ हजाराच्या महसुलाची भर जिल्ह्याच्या तिजोरीत टाकली आहे. डिसेंबरअखेर जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत या कारवाईतून केवळ ८३ लाख २५ कोटी इतक्याच दंडाची वसुली झाली होती. मात्र, जानेवारी या एकाच महिन्यात रत्नागिरी उपविभागाने केलेल्या या दंडवसुलीमुळे जिल्ह्याच्या महसुलात वाढ झाली आहे. उर्वरित उपविभागीय कार्यालयांची या महिन्यातील वसुली शून्य आहे. रत्नागिरी तहसील कार्यालयानेही दंडाच्या वसुलीत अव्वल स्थान राखले असून, या महिन्यात ८ लाख ४२ हजाराचा दंड वसूल केला आहे. इतर कार्यालयांकडून किरकोळ वसुली झाली आहे.
गुहागर, संगमेश्वर, दापोली, मंडणगड, चिपळूण आदी तहसील कार्यालयांची अवैध उत्खननप्रकरणी शून्य रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, खेड तहसील कार्यालयाकडून एकाही अवैध वाहतुकीवर कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)
जानेवारीत केलेली वसुली
उपविभागउत्खनन वाहतूक
खेड०.०००.१२
रत्नागिरी२११.७५०.००
चिपळूण०.००३.०३
दापोली०.०००.३७
राजापूर०.०००.००
तहसील स्तर
मंडणगड०.००१.२०
दापोली०.०००.६३
खेड०.५००.००
चिपळूण०.००२.३७
संगमेश्वर०.००२.२५
गुहागर०.००२.०९
रत्नागिरी७.७१०.७१
राजापूर०.३१०.३४
लांजा०.७३०.१५
एकूण२२१.००१३.२६