जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर :राजन तेली यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:29 PM2021-01-16T12:29:32+5:302021-01-16T12:30:51+5:30

Rajan Teli Kankavli Sindhdurug- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.

Abuse of power for district bank elections: Rajan Teli's criticism | जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर :राजन तेली यांची टीका

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर :राजन तेली यांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.

कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, राज्य सरकारने जिल्हा बँकेची मुदत संपल्यावर आतापर्यंत ३ वेळा मुदतवाढ दिली आहे . या मुदतवाढिच्या काळातच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ७० टक्केहून अधिक ठराव झालेले असताना विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवली आहेत . जिल्हा बँक निवडणुकीत स्वतःला मतदान होण्यासाठी मतदारांच्या शँभरहून अधिक नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी दिली आहे .

निवडणूक आयुक्तांकडे याबाबत आम्ही तक्रार केली असून त्यांचे लक्ष वेधले आहे.या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची मागणी आम्ही केलेली आहे . काही वृत्तपत्रात दिलेल्या नोटीस नुसार उर्वरित नवीन ठराव देण्यासाठी १८ ते २२ जानेवारी २०२१ हा फक्त ५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे . यातून राज्य सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचे सिद्ध होत असल्याची टीका राजन तेली यांनी केली.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मतदानाचे अधिकार असलेले ४५७ ठराव येणे अजूनही बाकी आहे . कोव्हीडमुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झालेल्या प्रक्रियेपासून गृहीत धरण्यात आला आहे . याविरोधात उच्च न्यायालयात भाजपा दाद मागणार आहे .

कोरोनाचे कारण पुढे करीत सत्ताधारी राजकारण करत आहेत . जिल्हा बँक निवडणूक पारदर्शी होणे गरजेचे आहे . त्यामुळे न्यायासाठी आम्ही आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही राजन तेली यावेळी म्हणाले .
 

Web Title: Abuse of power for district bank elections: Rajan Teli's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.