चारही उपसरपंच बिनविरोध, सरपंचांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:02 PM2019-05-03T12:02:49+5:302019-05-03T12:08:49+5:30
वैभववाडी तालुक्यातील आखवणे-भोम, तिरवडे तर्फ सौंदळ व कुसूर या तीन ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, मौदेसह चारही ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असून तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजप तर अन्य तीन ग्रामपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच झाले आहेत.
वैभववाडी : तालुक्यातील आखवणे-भोम, तिरवडे तर्फ सौंदळ व कुसूर या तीन ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, मौदेसह चारही ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असून तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजप तर अन्य तीन ग्रामपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच झाले आहेत.
विलासराव निंबाळकर
२३ मार्चला झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आखवणे-भोम आणि कुसूरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तर तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजपाचा सरपंच निवडून आला. मौदेचे सरपंच पद रिक्त राहिले आहे.
आकाराम नागप
दरम्यान, मंगळवारी नवनिर्वाचित सरपंच आर्या अभय कांबळे (आखवणे-भोम, स्वाभिमान), मनिषा मनोहर घागरे (तिरवडे तर्फ सौंदळ - भाजप) व शिल्पा शिवाजी पाटील (कुसूर-स्वाभिमान) यांनी पदभार स्वीकारला.
अनंत कांबळे
दरम्यान, मंगळवारी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया झाली. यामध्ये मौदे-अनंत कांबळे, आखवणे-भोम- आकाराम नागप, तिरवडे तर्फ सौंदळ- विलासराव निंबाळकर तर कुसूर उपसरपंचपदी प्रकाश झगडे यांची बिनविरोध निवड झाली.
प्रकाश झगडे
मौदेच्या सरपंच पदाचा पदभार उपसरपंच अनंत कांबळे यांच्याकडे सोपविला जाणार आहे. नवनिर्वाचित सरपंच व नूतन उपसरपंचांचे अभिनंदन केले जात आहे.