मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे अपघात, रिक्षा-कारची समोरासमोर धडक 

By सुधीर राणे | Published: February 1, 2024 12:37 PM2024-02-01T12:37:49+5:302024-02-01T12:38:03+5:30

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर नांदगाव, कोळंबा मंदिर समोर मुंबईच्या दिशेने जाणारी कार व रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर ...

Accident at Nandgaon on Mumbai Goa highway, rickshaw car collided head-on | मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे अपघात, रिक्षा-कारची समोरासमोर धडक 

मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे अपघात, रिक्षा-कारची समोरासमोर धडक 

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर नांदगाव, कोळंबा मंदिर समोर मुंबईच्या दिशेने जाणारी कार व रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात रिक्षातील‌ एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचालकास किरकोळ मार लागला. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या  सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार चालक अथांग योगेंद्र सामंत (वय २८, रा.गंगापूर रोड, नाशिक) हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. याच मार्गावर विरूद्ध दिशेने रिक्षा चालक मामुद अमीर काझी (रा. असलदे, शिवाजीनगर) हे नांदगाव येथून प्रवाशी रोशन किरण गमरे (मूळ रा. भायखळा, मुंबई, सध्या राहणार नांदगाव) याला घेऊन जात असताना दोन्ही वाहनांची धडक झाली.

या अपघातानंतर नागरीकांनी तत्काळ जखमी रिक्षा चालक व जखमी प्रवाशी याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी कणकवली  येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी शेडगे, किरण कदम, चंद्रकांत माने, एम.व्ही. गुरव, सरपंच रविराज मोरजकर आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून प्राथमिक पंचनामा केला. या अपघातात कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

Web Title: Accident at Nandgaon on Mumbai Goa highway, rickshaw car collided head-on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.