मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात; ब्रिजवरून कंटेनर थेट नदीत कोसळला, २ जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:10 AM2022-03-23T09:10:27+5:302022-03-23T11:05:36+5:30

सदर कंटेंनर वाहनामध्ये सीपला कपणीचे मेडिसिन घेऊन मुंबईच्या दिशेने चालला होता.

Accident on Mumbai-Goa highway; The container fell directly into the river from the bridge, killing 2 people on the spot | मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात; ब्रिजवरून कंटेनर थेट नदीत कोसळला, २ जणांचा जागीच मृत्यू 

मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात; ब्रिजवरून कंटेनर थेट नदीत कोसळला, २ जणांचा जागीच मृत्यू 

Next

- संतोष पाटणकर

खारेपाटण- मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटण मुख्य ब्रिजवर रात्री ११.३० च्या दरम्यान गोव्याच्या दिशेने आलेला व मुंबईच्या दिशेने जाणार महेश ट्रान्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड कम्पनीचा एक कंटेनर भारत ब्रेंज कँपणीचे  अवजड वाहन क्र.एम एच ४७ ए एस २२६० भरदाव वेगाने जात असताना खारेपाटण ब्रिजवरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये वाहन चालक व क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात किशन सुभाष - वाहन चालक वय ३३ राहणार उत्तरप्रदेश व सोबत क्लीनर ओळख पटली नाही अशा दोघांचा हागीच मृत्यू झाला.

सदर कंटेंनर वाहनामध्ये सीपला कपणीचे मेडिसिन घेऊन मुंबईच्या दिशेने चालला होता. अपघात एवढा भीषण होता की खारेपाटण ब्रिजवरून सुमारे ८० फूट खोल नदीत पाण्यात कोसळला. परंतु नदीत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. गावकऱ्यांच्या मदतीने खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी पोलीस नाईक उद्धव साबळे,होमगार्ड अमोल परब,भालचंद्र तीवरेकर ,वन विभागाचे विषवनाथ माळी, खारेपाटण ग्रामस्थ नितीन चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,संदेश धुमाळे आदींनी तातडीने सहकार्य केले. रस्त्रीचा काळोख असल्याने मदत करताना अडचण येत होती. मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुढील तपसासाठी नेण्यात आले. या अपघाताचा  अधीक तपास खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करत आहे. 

Web Title: Accident on Mumbai-Goa highway; The container fell directly into the river from the bridge, killing 2 people on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.