विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 17, 2022 06:49 PM2022-09-17T18:49:24+5:302022-09-17T18:49:47+5:30

पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना

Accidental oil tanker spill? Important information provided by the Coast Guard Department of Ratnagiri | विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

googlenewsNext

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात पार्थ हे १०१ मी. लांबीचे तेल वाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रत झाले आहे. अपघातात जहाजावरील १९ खलाशी यांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेच्या अनुषंगाने कमाडंट कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या जहाजावर कोस्ट गार्डची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. अद्याप जहाजातून कोणत्याही प्रकारे तेल गळती सुरु झालेली नाही. अशी माहिती कोस्ट गार्ड रत्नागिरीचे कमांडट यांनी दिली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८८४७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

घटनेच्या अनुषंगाने प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मालवण, तहसिलदार देवगड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देवगड यांना संयुक्तरित्या स्थळ पाहणी करुन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना सादर करण्याच्या तसेच घटनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये कोणत्याही अफवा पसरणार नाहीत याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली आहे.

आवश्यक खबरदारी

हे तेलवाहू जहाज असल्याने या जहाजातून तेल गळती झाल्यास विजयदूर्ग ते मालवण भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. मात्र अशी तेल गळती झाल्यास त्यावर त्वरीत उपाययोजना करता यावीत. या करीता कोस्ट गार्डचे एक जहाज चोवीस तास परिस्थितीचे निरीक्षण करीत आहे. तेल गळती होऊन तेल समुद्र किनाऱ्यावर येवू नये याकरीता आवश्यक ती खबरदारी कोस्ट गार्ड करुन घेण्यात येत आहे.

जहाजात मोठा डांबर साठा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय मालवण यांनी आवश्यक त्या सूचना मच्छिमार सोसायट्यांना निर्गमित केलेल्या असून परवाना अधिकारी देवगड, मालवण व वेंगुर्ला यांना मुख्यालय न सोडणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांच्याकडून जहाजाच्या मालकाला याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. जहाजात सद्यस्थितीत डांबर साठा असून हा साठा पाण्याच्या तळाशी जावून बसणार आहे. त्यामुळे तेल गळतीचा धोका कमी असल्याचे प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी सांगितले आहे.

पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना

तेल गळती झाली किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी यांना कळविण्यात आलेले असून समुद्राच्या पाण्याची तपासणी करून या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Accidental oil tanker spill? Important information provided by the Coast Guard Department of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.