बांदा, दोडामार्गमधील माकडतापाची साथ : रुग्णांसाठी गोवा प्रशासनाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 01:49 PM2020-04-23T13:49:12+5:302020-04-23T13:50:51+5:30

बांबोळी-गोवा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात आपण स्वत: गोवा प्रशासनाशी चर्चा करणार आहोत, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

Accompanied by monkey fever in Banda, Dodamarg: | बांदा, दोडामार्गमधील माकडतापाची साथ : रुग्णांसाठी गोवा प्रशासनाशी चर्चा

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाºयांशी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चर्चा केली.

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आश्वासन

बांदा : बांदा, दोडामार्ग हा माकडताप प्रवण परिसर असल्याने संशयितांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे नियोजन आठवड्यातून किमान दोन दिवस करावे. पुणे येथून येणाऱ्या अहवालांना विलंब होत असल्याने तातडीने अहवाल मिळण्यासाठी मणिपाल रुग्णालय प्रशासनाशी आरोग्य विभागाने चर्चा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बांदा येथे दिल्या. बांबोळी-गोवा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात आपण स्वत: गोवा प्रशासनाशी चर्चा करणार आहोत, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

माकडताप व कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

बांदा आरोग्य केंद्रांतर्गत यावेळी एकही माकडताप रुग्ण सापडला नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी बांदा हे माकडताप साथीचे मुख्य केंद्र होते. मणिपालच्या सहाय्याने बांदा येथे रक्त तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. मणिपाल केंद्र बंद केल्याने रक्त तपासणी नमुने हे आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारी पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात येत होते. जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून सोमवारी व गुरुवारी असे दोन दिवस नमुने तपासणीसाठी पाठवावेत व त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे अशा सूचना दिल्या.

अलर्ट राहून काम करा
मणिपाल रुग्णालयातून रक्त तपासणी अहवाल हे तत्काळ मिळत होते. यासाठी मणिपालशी चर्चा करून पुन्हा ही सुविधा सुरू करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाºया सुविधांचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. माकडतापाचे रुग्ण सातत्याने आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेने अलर्ट राहून काम करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
 

Web Title: Accompanied by monkey fever in Banda, Dodamarg:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.