अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून केला विनयभंग ;आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 14:15 IST2021-05-06T14:11:33+5:302021-05-06T14:15:51+5:30
Crimenews Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी ऋषभ रवींद्रनाथ बांदिवडेकर ( वय 19, मूळ रा. तळेरे ) या युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून केला विनयभंग ;आरोपी अटकेत
कणकवली : कणकवली तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी ऋषभ रवींद्रनाथ बांदिवडेकर ( वय 19, मूळ रा. तळेरे ) या युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषभ हा आपल्या नातेवाईकांकडे राहायला असतो. मुंबई येथे राहणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गतवर्षी लॉकडाऊन मध्ये कणकवली तालुक्यातील आपल्या गावी आली होती. त्यानंतर पीडित मुलगी आणि ऋषभ यांची ओळख झाली होती. ओळखीतून व्हाट्सअपवर चॅटिंग होत असे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने ऋषभ याला पुन्हा कुठलाही मेसेज करू नकोस, असे सांगत अटकाव केला होता.
दरम्यान ऋषभ याने पीडित मुलीचे व्हिडीओ कॉल दरम्यान काही आक्षेपार्ह फोटो काढून पीडित युवतीचा विनयभंग केल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार ऋषभ बांदिवडेकर याच्यावर पोक्सो अधिनियमचे कलम तसेच विनयभंग केल्याप्रकरणी भा. दं. वि. 354 तसेच सायबर क्राईम ऍक्ट 66 इ, 67 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ऋषभ याला 5 मे रोजी रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपास डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर करत आहेत.