हिम्बज् प्रकरणातील आरोपी वाढणार

By admin | Published: January 15, 2015 10:14 PM2015-01-15T22:14:34+5:302015-01-15T23:30:12+5:30

साडेतीन कोटींची फसवणूक : बाराजणांना सावंतवाडीत आणले; सहा जणांचा शोध

Accused in Hamburg case | हिम्बज् प्रकरणातील आरोपी वाढणार

हिम्बज् प्रकरणातील आरोपी वाढणार

Next

सावंतवाडी : सिंधुदुर्गसह अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या हिम्बज् हॉलिडेज फसवणूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या बारा जणांना गुरूवारी सावंतवाडीत आणण्यात आले. त्यानंतर त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता, बाराही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सावंतवाडीत तालुक्यात हिम्बज्च्या संचालकानी ठेवीदारांना ३ कोटी ४० लाख रूपयांना गंडविले असून हे पैसे परस्पर हडप केले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी बाराजणांना ताब्यात घेतले असले तरी आरोपीची संख्या वाढणार असून सहाजणाच्या शोधात पोलीस आहेत.महाराष्ट्रात गाजत असलेल्या हिम्बज् हॉलिडेज प्रकरणी संस्थेच्या संचालकानी वेगवेगळ्या चार कंपन्याची स्थापना केली. यात प्रमुख कंपनी म्हणून हिम्बज् हॉालिडेजची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ठेवीदाराची संख्या वाढत गेली तसे कंपन्याचा विस्तार केला. यात हायटेक मुदूहारी प्रा.लि, हिम्ब्स कन्स्ट्रक्शन प्रा. लि., आयटेक्स आय प्रा. लि अशा कंपन्याची स्थापना केली. या कंपन्यांच्या माध्यमातून संचालकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोट्यवधीच्या ठेवी गोळा केल्या. यावेळी संचालकांनी ठेवीदारांना दुप्पट पैशाचे आमिष दाखून ठेवी गोळा केल्या आहेत.याप्रकरणी मुंबई येथे हिम्बज्च्या संचालकांवर सहा महिन्यांपूर्वी गुन्हे दाखल झाले होते. तसेच मुंबई येथे आर्थिक गुन्हा शाखेने या आरोपींना अटकही केली होती. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी हे आरोपी सावंतवाडीतील ठेवीदाराच्या फसवणूकप्रकरणी हवे आहेत, असे सांगून न्यायालयाकडे विनंती केली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगेश मधुकर शेर्लेकर (वय ३७ रा. साळगाव, कुडाळ) दिनेश बळवंत सकपाळ (वय ३७ रा. परेल मुंबई) संतोष तुकाराम काजरोळकर (वय ४२ रा. भाईदर ठाणे) राजन मच्छीेंद्र चाकणे (वय ३४ रा. शिवडी मुंबई) गुरूनाथ जनार्दन सावंत (वय ३३ रा. तुळसुली कुडाळ) गणेश बाळू शिंदे (वय ३३ रा.परेल मुंबई) किरण सुधाकर आरेकर (वय ३० रा. मुरगवाडी रत्नागिरी) युवराज सत्ताप्पा पाटील (वय ३२ रा. लालबाग मुंबई) महेश दत्ताराम पालकर (वय ३५ रा. करवाचीवाडी ,रत्नागिरी) प्रभाकर धाकरोबा दळवी (वय ३७ रा. देऊळवाडी रत्नागिरी) रामचंद्र नारायण बनसोडे (वय ३४ रा. रत्नागिरी) आरिफ अमीनुद्दीन मर्चंट (वय ४० रा. रसपुरा मुंबई) या बाराजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित सहाजण अद्याप सापडले नसून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
बाराजणांवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी असून पोलीस त्यांना प्रत्येक गुन्ह्यात ताब्यात घेणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदिप दिवटे यांनी मुंबई येथून या आरोपींना सावंतवाडीत आणल्यानंतर त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणाची तक्रार ज्ञानदेव जयराम गोडकर (रा. तळवडे) यांनी पोलिसात दिली आहे. (प्रतिनिधी)
हिम्बज् प्रकरणातील आरोपी वाढणार
साडेतीन कोटींची फसवणूक : बाराजणांना सावंतवाडीत आणले; सहा जणांचा शोध
सावंतवाडी : सिंधुदुर्गसह अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या हिम्बज् हॉलिडेज फसवणूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या बारा जणांना गुरूवारी सावंतवाडीत आणण्यात आले. त्यानंतर त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता, बाराही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सावंतवाडीत तालुक्यात हिम्बज्च्या संचालकानी ठेवीदारांना ३ कोटी ४० लाख रूपयांना गंडविले असून हे पैसे परस्पर हडप केले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी बाराजणांना ताब्यात घेतले असले तरी आरोपीची संख्या वाढणार असून सहाजणाच्या शोधात पोलीस आहेत.
महाराष्ट्रात गाजत असलेल्या हिम्बज् हॉलिडेज प्रकरणी संस्थेच्या संचालकानी वेगवेगळ्या चार कंपन्याची स्थापना केली. यात प्रमुख कंपनी म्हणून हिम्बज् हॉालिडेजची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ठेवीदाराची संख्या वाढत गेली तसे कंपन्याचा विस्तार केला. यात हायटेक मुदूहारी प्रा.लि, हिम्ब्स कन्स्ट्रक्शन प्रा. लि., आयटेक्स आय प्रा. लि अशा कंपन्याची स्थापना केली. या कंपन्यांच्या माध्यमातून संचालकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोट्यवधीच्या ठेवी गोळा केल्या. यावेळी संचालकांनी ठेवीदारांना दुप्पट पैशाचे आमिष दाखून ठेवी गोळा केल्या आहेत.
याप्रकरणी मुंबई येथे हिम्बज्च्या संचालकांवर सहा महिन्यांपूर्वी गुन्हे दाखल झाले होते. तसेच मुंबई येथे आर्थिक गुन्हा शाखेने या आरोपींना अटकही केली होती. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी हे आरोपी सावंतवाडीतील ठेवीदाराच्या फसवणूकप्रकरणी हवे आहेत, असे सांगून न्यायालयाकडे विनंती केली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगेश मधुकर शेर्लेकर (वय ३७ रा. साळगाव, कुडाळ) दिनेश बळवंत सकपाळ (वय ३७ रा. परेल मुंबई) संतोष तुकाराम काजरोळकर (वय ४२ रा. भाईदर ठाणे) राजन मच्छीेंद्र चाकणे (वय ३४ रा. शिवडी मुंबई) गुरूनाथ जनार्दन सावंत (वय ३३ रा. तुळसुली कुडाळ) गणेश बाळू शिंदे (वय ३३ रा.परेल मुंबई) किरण सुधाकर आरेकर (वय ३० रा. मुरगवाडी रत्नागिरी) युवराज सत्ताप्पा पाटील (वय ३२ रा. लालबाग मुंबई) महेश दत्ताराम पालकर (वय ३५ रा. करवाचीवाडी ,रत्नागिरी) प्रभाकर धाकरोबा दळवी (वय ३७ रा. देऊळवाडी रत्नागिरी) रामचंद्र नारायण बनसोडे (वय ३४ रा. रत्नागिरी) आरिफ अमीनुद्दीन मर्चंट (वय ४० रा. रसपुरा मुंबई) या बाराजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित सहाजण अद्याप सापडले नसून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
बाराजणांवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी असून पोलीस त्यांना प्रत्येक गुन्ह्यात ताब्यात घेणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदिप दिवटे यांनी मुंबई येथून या आरोपींना सावंतवाडीत आणल्यानंतर त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणाची तक्रार ज्ञानदेव जयराम गोडकर (रा. तळवडे) यांनी पोलिसात दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Accused in Hamburg case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.