अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी त्या आरोपीस पुन्हा घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 02:38 PM2019-12-20T14:38:51+5:302019-12-20T14:41:00+5:30
देवगड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जामीन मिळालेल्या राजेंद्र्र मारुती साटम याला देवगड न्यायालयाने मिळालेला जामीन रद्द करून पुन्हा अटक करण्याचे आदेश देवगड पोलिसांना दिले. पीडित युवतीने न्यायालयासमोर सत्य प्रतिज्ञापूर्वक शपथपत्र लिहून दिल्याने देवगड पोलिसांनी त्याला गुरुवारी सायंकाळी उशिरा पुन्हा ताब्यात घेतले आहे.
देवगड : देवगड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जामीन मिळालेल्या राजेंद्र्र मारुती साटम याला देवगड न्यायालयाने मिळालेला जामीन रद्द करून पुन्हा अटक करण्याचे आदेश देवगड पोलिसांना दिले. पीडित युवतीने न्यायालयासमोर सत्य प्रतिज्ञापूर्वक शपथपत्र लिहून दिल्याने देवगड पोलिसांनी त्याला गुरुवारी सायंकाळी उशिरा पुन्हा ताब्यात घेतले आहे.
१२ डिसेंबर रोजी देवगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजेंद्र्र साटम याने दुचाकीवरून जामसंडे येथे एका गॅरेजशेजारी असलेल्या गाडीतून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या परिचित असलेल्या विजयदुर्ग येथील विजय पोसम याला फोनव्दारे संपर्क करून राजेंद्र साटम याने दिला.
तुला जामसंडेवरून विजयदुर्ग येथे घेऊन येण्यासाठी विशाल पुजारे येणार असल्याचे सांगितले. यानुसार विशाल पुजारे याने त्या पीडित मुलीला विजयदुर्ग येथील मुकेश खडपे यांच्या बंगल्यामध्ये नेऊन रात्री जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर पीडित मुलगी १३ डिसेंबर रोजी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर विशाल पुजारे याने तिला काहीच घडले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर दिवसभर ती मुलगी खडपे यांच्या बंगल्यावर रात्री ११.३० वाजेपर्यंत होती. रात्री ११.३० वाजता ह्यत्याह्ण मुलीला झोपेतून उठवून देवगड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार व पराग मोहिते यांनी देवगड पोलीस स्टेशन येथे त्या पीडित युवतीला नेऊन तिचा जबाब स्वत:च पोलिसांनी टाईप केला.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार व पराग मोहिते हे मुलीच्या आईवडिलांवर दबाव टाकून या प्रकरणामध्ये राजेंद्र्र साटम यांचा काहीही संबंध नसल्याचे वारंवार मुलीच्या आईवडिलांना सांगत होते. तसेच राजेंद्र मारुती साटम यांनी पीडित युवतीवरती नोव्हेंबर महिन्यामध्ये कणकवली, डोंबिवली व ठाणे व त्यानंतर जामसंडे येथे अत्याचार केला असून त्याची व्हिडिओ क्लीप असल्याचे सांगून तिला ब्लॅकमेल केले जात होते. तिच्या इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवल्यास राजेंद्र साटम तिला वारंवार भाग पाडत होता.
देशभरात हैदराबाद, दिल्ली अत्याचार प्रकरणामधील अनेक ठिकाणी निदर्शने केली जात असतानाच देवगडमधील या प्रकरणामधील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम पोलीसच करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनामधून ज्यांच्यावर भरवसा ठेवला जातो ते पोलीसच आरोपींना पाठीशी घालून पीडित महिलांनाच त्रास देण्याचे काम करीत असल्याचे देवगड तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणावरून स्पष्ट दिसून येत आहे.
पीडित युवतीचा जबाब; आरोपीला दिलेला जामीन केला रद्द
कणकवली, डोंबिवली, ठाणे व जामसंडे या चारही ठिकाणी पीडित युवतीला नेऊन अत्याचार केले असल्याचे पीडित युवतीने १९ डिसेंबर रोजी देवगड न्यायालयामध्ये सत्य प्रतिज्ञापूर्वक शपथपत्रामध्ये जबाब लिहून दिला आहे. यावरुन देवगड न्यायालयीने या गुन्ह्यातील जामिनावर बाहेर असलेल्या राजेंद्र मारुती साटम याला तत्काळ अटक करण्याचे आदेश देवगड पोलीस स्थानकाला दिल्यानंतर देवगड पोलिसांनी सायंकाळी उशिरा साटम याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांवर संशय; चौकशीचे आदेश
तसेच सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांनी या तपासामधील अधिकारी व कर्मचारी यांची गोपनीय चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले आहेत. यामुळे संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार व पोलीस कॉन्टेबल पराग मोहिते यांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.