आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई सुरू, ११ हजार रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:37 AM2024-06-19T11:37:12+5:302024-06-19T11:37:45+5:30
सावंतवाडी : आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या २ दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...
सावंतवाडी : आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या २ दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून घाटात अस्वच्छता करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, अशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कचरा टाकणाऱ्या २, धूम्रपान करणाऱ्या ३, मद्यपान करणाऱ्या २, तर माकडांना खाऊ घालणाऱ्या ६ व्यक्तींवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वनविभागाकडून आवाहन केल्यानंतर सर्वच ठिकाणी आंबोली घाटात फलक लावण्यात आले असून गेल्या दोन दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व ११,५०० रुपये दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकणारे- २ व्यक्ती, धूम्रपान करणारे - ३ व्यक्ती, मद्यपान करणारे- २ व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- ६ व्यक्ती अशा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधता टिकविण्यासाठी मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करून तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.