‘शैरानी’ची चार पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई

By admin | Published: September 24, 2015 11:28 PM2015-09-24T23:28:21+5:302015-09-24T23:53:54+5:30

आठ खलाशी ताब्यात : ३ रत्नागिरीतील, १ मालवणातील

Action on 'Charanani' four-party trailers | ‘शैरानी’ची चार पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई

‘शैरानी’ची चार पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई

Next

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ गेले आठ दिवस सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या आक्रमक मागणीनंतर मत्स्य विभागाच्या ‘शैरानी’ गस्ती नौकेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री मालवण समुद्रात १५ वाव खोल मासेमारी करणाऱ्या चार पर्ससीन ट्रॉलर्स आणि आठ खलाशांना ताब्यात घेतले. यात रत्नागिरीतील तीन, तर मालवणमधील एका ट्रॉलरचा समावेश आहे. दरम्यान, चारही ट्रॉलर्सच्या कारवाईचा प्रस्ताव मालवण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. मत्स्य विभागानेही धडक कारवाई दिवस-रात्र सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन व हायस्पीडचा धुमाकूळ राजरोसपणे सुरू आहे. पारंपरिक मच्छिमारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मत्स्य विभागाने गेल्या दोन दिवसांपासून दिवस-रात्र गस्त सुरूकेली आहे. मंगळवारी रात्री गस्ती नौकेने तीन ट्रॉलर्स पकडले होते. मात्र, त्यांच्याकडे परवाना असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती, तर बुधवारी ‘शैरानी’ने रात्रीपासून सुरूकेलेली गस्त पहाटे सहा वाजेपर्यंत सुरूठेवत चार ट्रॉलर्सवर कारवाई केली. (प्रतिनिधी)

आठपैकी चौघांवर कारवाई
मत्स्य विभागाच्या बुधवारी रात्रीच्या गस्त मोहिमेत शैरानीच्या कारवाई पथकाने आठ पर्ससीन ताब्यात घेतले. यापैकी सुधाकर मोंडकर (धनसागर), आरिफ दर्वे (सलमा खातू), विकास सावंत (हेरंब) या तीन रत्नागिरी येथील पर्ससीन ट्रॉलर्सवर परवाना, तर मालवण येथील रवींद्र रेवंडकर (चंद्रिका) यांच्याकडे पर्ससीन विमा परवाना नसल्याने एकूण चार ट्रॉलर्सवर कारवाई केली. प्रत्येक नौकेतील पागी व खलाशी अशा दोघांना चौकशीसाठी व जबाब नोंदणीसाठी गस्ती नौकेतून मालवणात आणण्यात आले.
तहसीलदार काय करणार ?
मासेमारी हंगाम सुरू होताच पर्ससीनच्या या अतिक्रमणाबाबत समुद्र्रात आंदोलन छेडणाऱ्या महेंद्र पराडकर यांना मत्स्य विभागाने कारवाईचे आश्वासन दिले होते, तर तहसीलदार यांनी कठोर कारवाई अनधिकृत पर्ससीनवर केली जाईल. मत्स्य विभागाने कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मत्स्य विभागाने चार पकडलेले पर्ससीनचे प्रस्ताव तयार झाले आहेत. आता तहसीलदार कोणती कारवाई करतात? याकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Action on 'Charanani' four-party trailers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.