गाडीचा पाठलाग करून अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:38 PM2020-07-07T15:38:27+5:302020-07-07T15:39:36+5:30

वेंगुर्ला : येथील मोचेमाड पुलावर पोलिसांनी सोमवारी पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान गाडीचा पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर धडक ...

Action on illegal liquor traffic, | गाडीचा पाठलाग करून अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

गाडीचा पाठलाग करून अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

Next
ठळक मुद्देअवैध दारू वाहतुकीवर कारवाईगाडीचा पाठलाग, कारचालक ताब्यात

वेंगुर्ला : येथील मोचेमाड पुलावर पोलिसांनी सोमवारी पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान गाडीचा पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. यात गोवा बनावटीच्या १ लाख ८३ हजार ३६० रुपयांच्या दारूसह १ लाख २० हजारांची चारचाकी मिळून सुमारे ३ लाख ३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर वेंगुर्ला गाडीअड्डा येथील कारचालक लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (३६) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोवा बनावटीच्या दारूने भरलेली कार (क्र. एम. एच. ०२, बीजी १३२७) भरधाव वेगाने शिरोड्याकडून वेंगर्ल्याच्या दिशेने जाताना वेंगुर्ला पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या टिमला दिसून आली. यावेळी पोलिसांनी हातातील विजेरीद्वारे गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडी अजून भरधाव वेगाने निघून गेली.

दरम्यान, पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून येथील मोचेमाड पुलावर गाडीला थांबविले. यात गोवा बनावटीच्या दारूसह चारचाकी व वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान, पोलीस नाईक सुरेश पाटील, पोलीस नाईक चोडणकर, होमगार्ड गिरप यांनी ही धडक कारवाई केली. या प्रकारणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान करीत आहेत.


वेंगुर्ला पोलिसांनी मोचेमाड पुलावर गोवा बनावटीची दारू पकडली.

Web Title: Action on illegal liquor traffic,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.