विनापरवाना ५५ मच्छिमारांवर कारवाई
By admin | Published: December 5, 2014 10:58 PM2014-12-05T22:58:01+5:302014-12-05T23:17:15+5:30
जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाईसाठी रत्नागिरीतील गस्तीनौकेसह परवाना अधिकाऱ्यांचे खास पथकही नियुक्त
मालवण : मत्स्य विभागाने धडक मोहीम राबविताना आतापर्यंत तीन दिवसांत तब्बल ५५ विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाईसाठी रत्नागिरीतील गस्तीनौकेसह परवाना अधिकाऱ्यांचे खास पथकही नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी दिली.दरम्यान, मत्स्य विभागाच्या धडक मोहिमेमुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांचे धाबे दणाणले आहेत. पारंपरिक मच्छिमारांनी बुधवारी मोर्चा काढून अनधिकृत पर्ससीनेट मासेमारीवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्याच दिवसापासून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयदुर्गपासून रेडीपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालायला सुरुवात केली. या कारवाईसाठी रत्नागिरी येथील तीन परवाना अधिकारी व एक गस्ती नौका मागविण्यात आली होती. / प्या गस्ती नौकेवर दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आज दिवसभरात शिरोडा, आचरा परिसरात कारवाई करण्यात आली. सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भूस्तर व जलस्तर अशा दया गस्ती नौकेवर दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
आतापर्यंत मत्स्य विभागामार्फत जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील ५५ विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईचा प्राथमिक अहवाल आज, शुक्रवारी त्यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
विनापरवानाधारकांचे धाबे दणाणले
मत्स्य विभागाने धडक मोहीम हाती घेतल्याने किनारपट्टीवर विनापरवाना मासेमारी करणाऱ्या पर्ससीनेट, पारंपरिक व गिलनेटधारक मच्छिमारांचे धाबे दणाणले आहेत.