मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 06:27 PM2020-12-23T18:27:24+5:302020-12-23T18:29:08+5:30
Hindu Janajagruti Samiti sindhudurg-३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, गड, किल्ले आदी ठिकाणी कार्यक्रम पार्ट्या तसेच मद्यपानावर बंदी घालण्यात यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान धूम्रपान करणाऱ्यांवर प्रतिबंध आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सिंधुदुर्ग : ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, गड, किल्ले आदी ठिकाणी कार्यक्रम पार्ट्या तसेच मद्यपानावर बंदी घालण्यात यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान धूम्रपान करणाऱ्यांवर प्रतिबंध आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीनेजिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
३१ डिसेंबर या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात अनेक जण मद्यपान, धूम्रपान तसेच अमली पदार्थांचे सेवन करतात. यातून नशा आला की रस्त्यावर वेगाने वाहन चालविणे, महिला व मुलींची छेडछाड काढणे, विनयभंग करणे यांसारखे गैरप्रकार घडतात.
यात युवा पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, त्यांचे आयुष्य या गैरप्रकारांमुळे उद्ध्वस्त होत आहे. शिवाय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून ध्वनी आणि वायू प्रदूषण केले जाते. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
शिवाय जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अजून कमी झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी मोठे कार्यक्रम झाल्यास त्या ठिकाणी युवा पिढी तसेच नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे गजानन मुंज, यशवंत परब, डॉ अशोक महिंद्रे, रवींद्र परब आदी उपस्थित होते.
गैरप्रकार रोखा
३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखावेत तसेच मद्यपानावर बंदी घालण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व धुम्रपान करणाऱ्यांवर प्रतिबंध आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.