Sindhudurg: अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील नौकेवर कारवाई; नौका जप्त, मासळीचा लिलाव

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 22, 2025 16:03 IST2025-04-22T16:00:37+5:302025-04-22T16:03:24+5:30

मालवण : अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे ...

Action taken against migrant boat in illegal fishing case in malavan sea Boat seized, fish auctioned | Sindhudurg: अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील नौकेवर कारवाई; नौका जप्त, मासळीचा लिलाव

Sindhudurg: अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील नौकेवर कारवाई; नौका जप्त, मासळीचा लिलाव

मालवण : अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलाव करण्यात आला. काल, सोमवारी (दि. २१) रात्री ११.३९च्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात ही कारवाई करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी तेजस्विता भ. करंगुटकर या नियमित गस्त घालत होत्या. यावेळी त्यांना अनधिकृत मासेमारी करणारी परप्रांतीय नौका दिसली. कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली वेदवती स. पुथरण (रा. मारीकंबा नगर थोत्तम, उडपी, राज्य - कर्नाटक) यांची "श्री महालक्ष्मी ३" (नोंदणी क्र. IND-KA-2-MM-6268) यांची ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मुणगेसमोर अनधिकृतरीत्या मासेमारी करताना आढळून आली.

या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमित हरमलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण/सर्जेकोट तसेच सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Action taken against migrant boat in illegal fishing case in malavan sea Boat seized, fish auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.