अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कारवाई
By admin | Published: January 4, 2017 05:59 PM2017-01-04T17:59:34+5:302017-01-04T17:59:34+5:30
अनधिकृत गौण खनिज वाहतुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत महसूल विभागाने चाप लावला आहे.
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 4 - अनधिकृत गौण खनिज वाहतुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत महसूल विभागाने चाप लावला आहे.कणकवली तहसीलदार गणेश महाडिक यांनी काळ्या दगडाची खडी आणि ग्रीडची बेकायदेशीर वाहतूक करणारे डंपर आणि ट्रॅक्टर बुधवारी पकडले.
तहसीलदार महाडिक यांनी धडक कारवाई करीत बुधवारी शहराजवळील गडनदीपुलानजीक ही कारवाई केली. तहसीलदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी गवस, मंडळ अधिकारी सुतार, तलाठी अजय परब, शिरसाट, परुळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पकडलेले डंपर आणि ट्रॅक्टर येथील तहसील कार्यालय आवारात आणण्यात आले होते. तसेच दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. या डंपर चालकांवर लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाईची शक्यता आहे. तहसीलदार गणेश महाडिक यांच्या धडक कारवाईने बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.