Nitin Gadkari : महामार्गाच्या 'त्या' ठेकेदारांवर कारवाई करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:49 PM2020-10-27T19:49:03+5:302020-10-27T20:14:27+5:30

Highway, work, nitin gadkari, pramod jathar, bjp, sindhdurug मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाचा ठेका मिळूनही ज्या ठेकेदारांनी अजूनही काम सुरु केलेले नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

Action will be taken against 'those' contractors of the highway! | Nitin Gadkari : महामार्गाच्या 'त्या' ठेकेदारांवर कारवाई करणार !

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी याना भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Next
ठळक मुद्देमहामार्गाच्या 'त्या' ठेकेदारांवर कारवाई करणार ! नितीन गडकरीकडून संकेत ; प्रमोद जठार यांची माहिती

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाचा ठेका मिळूनही ज्या ठेकेदारांनी अजूनही काम सुरु केलेले नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

मुंबई - गोवा महामार्गाच्या समस्यांबाबत चिपळूण ते राजापूर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा आपण केला. त्यानंतर सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत मुंबई - गोवा महामार्गाच्या समस्या जास्त असल्याची बाब समोर आली. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास संबधित बाब आणून देण्यात आली आहे.

संगमेश्वर शहरात होत असलेले जास्तीचे भूसंपादन थांबवून पुन्हा पुलाचे आराखडे तयार करण्यात यावेत . अशी मागणी जनतेची असून त्याचे निवेदन देण्यात आले असून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे आपण केली.

मुंबई -गोवा महामार्गाचे जे कंत्राटदार निविदा मिळून सुद्धा अजूनही काम सुरु करीत नाहीत . त्यांची कामे त्वरित काढून घेऊन त्यांना जनतेच्या अडचणीत भर घातल्याबद्दल व सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्ल दंड लावावा . तसेच तो वसुल करुन जनकल्याणासाठी वापरावा अशी मागणीही केली . त्यावर मंत्री गडकरी यांनी आपण सुद्धा आता त्याच निष्कर्षास आलो असून दोन दिवसात आढावा बैठक घेऊन कारवाईचा दणका या कंत्राटदरांना देण्याचे संकेत यावेळी दिले आहेत . तसेच संगमेश्वर शहरवासीयांना सुद्धा न्याय देण्याचे त्यांनी मान्य केल्याची माहिती प्रमोद जठार यांनी या दिली आहे.
 

Web Title: Action will be taken against 'those' contractors of the highway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.