भाजीपाला पिकवण्याबरोबरच कृषी विद्यार्थ्याना विक्री कौशल्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:55 PM2019-03-13T12:55:51+5:302019-03-13T12:57:50+5:30

कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी आणि लागवड ज्ञान देणे एवढ्यावरच न थांबता शेतात पिकवलेला माल योग्य भावात विकण्याचे कौशल्य ही शिकण्याचे कसब कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाने निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांनी विद्यालयात पिकवलेला भाजीपाला सोमवारच्या फोंडाघाट आठवडी बाजारात विद्यार्थ्यांमार्फत विक्री केला जात असून त्याला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

In addition to the cultivation of vegetables, sales skills are needed | भाजीपाला पिकवण्याबरोबरच कृषी विद्यार्थ्याना विक्री कौशल्य गरजेचे

विद्यार्थ्यांनी विद्यालयात पिकवलेला भाजीपाला सोमवारच्या फोंडाघाट आठवडी बाजारात विद्यार्थ्यांमार्फत विक्री केला जात असून त्याला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Next
ठळक मुद्देभाजीपाला पिकवण्याबरोबरच विक्री कौशल्य गरजेचेफोंडाघाट येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना दिले जातात धडे

सिंधुदुर्ग : कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी आणि लागवड ज्ञान देणे एवढ्यावरच न थांबता शेतात पिकवलेला माल योग्य भावात विकण्याचे कौशल्य ही शिकण्याचे कसब कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाने निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांनी विद्यालयात पिकवलेला भाजीपाला सोमवारच्या फोंडाघाट आठवडी बाजारात विद्यार्थ्यांमार्फत विक्री केला जात असून त्याला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

केवळ शेती आणि भाजीपाला पिकवणे एवढच ज्ञान घेऊन शेती करणार्या शेतकर्यांजवळ जर विक्री कौशल्य नसेल तर शेतात तयार झालेला माल दलालांना कवडीमोल दराने विकावा लागतो. यासाठी भावी शेतकरी, कृषीतज्ज्ञ घडविणार्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याना आधुनिक शेती लागवडीबरोबरच तयार मालाचे चांगल्या भावात विक्री करण्याचे कौशल्यही शिकवल्यास त्यांच्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करून आपल्या बरोबर इतरही शेतकर्यांना मार्गदर्शन करू शकतात.

या दृष्टीने फोंडाघाट येथील मराठे कृषी महाविद्यालयात प्रा. किरण दांगडे, प्रा. मिलींद कोरगांवकर यांनी आपल्या सहशिक्षकांमार्फत चतुर्थ वर्षाच्या उद्यानविद्या विभागातील विद्यार्थ्याना लागवडीबरोबरच विक्री कौशल्यही शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या चतुर्थ वर्षातील २० विद्यार्थ्यांमार्फत कृषी महाविद्यालय परिसरात वेगवेगळ््या भाज्यांची लागवड केली. संपूर्णसेंद्रीय पद्धतीने वांगी, लालमाठ, वाली, मुळा आदी भाज्यांची लागवड केली. पिकाला लागणारी जैविक खतांची मात्रा, पाण्याची मात्रा, आंतरमशागत, दोन पिकांमध्ये ठेवायचे अंतर याबाबत योग्य ती खबरदारी घेत त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली.

तयार झालेल्या पिकाला दलालामार्फत विक्री केल्यास योग्य दर मिळणार नाही. शिवाय अशाप्रकारे विक्री करण्याचे तंज्ञ अवलंबल्यास विद्यार्थ्यांनाही तीच सवय लागू शकते. यादृष्टीने विद्यालयाचे प्रा. किरण दांगडे, प्रा. मिलींद कोरगांवकर यांनी तयार भाजीपाला विद्यार्थ्यांमार्फत स्थानिक बाजारात नेऊन विकल्यास विक्रीचे कौशल्यही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते.

या दृष्टीनेच या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. परेश जोशी, प्रा. मिलींद कोरगांवकर, प्रा. योगेश पेडणेकर, प्रा. किरण दांगडे, प्रा. प्रसाद खांबल, प्रा. प्रवीण राऊत, प्रा. प्रसाद ओगले आदींच्या मार्गदर्शनाखाली चतुर्थ वर्षाच्या २० विद्यार्थ्यांनी फोंडाघाटच्या आठवडा बाजारात हा भाजीपाला विकून चांगला नफा मिळविला. तसेच त्यांच्या भाजीपाला केंद्राला लोकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

चतुर्थ वर्ष उद्यानविद्या विभागातील इच्छाश्री म. केरकर, लिखिता कोयंडे, राधेश राणे, संदीप वैद्य, विवेक नकाते, महेश जगदाळे, तुकाराम जानकर, स्वप्नाली लोकरे, पुजा लिगडे, विशाल येले, ऋतुजा पाटील, हरिनाथ रेड्डी, रमन्ना रेड्डी, श्यामसुंदर रेड्डी, रश्मी पांचाळ, रूपर फर्नांडीस, योगेश पाटील, आकाश जाधव, साके अंजी आदी विद्यार्थी होते.
 

Web Title: In addition to the cultivation of vegetables, sales skills are needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.