अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:37 PM2020-10-31T12:37:51+5:302020-10-31T12:40:13+5:30

Amboli hill station, Sawantwadi, forest department, sindhudurg सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ चिखलवाळ बेरडकी या दुर्गम वाडी मधील नागेश रेमु नाईक (५२) यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. नागेश हे आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असता सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास अचानक पणे नाईक यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.

Adults seriously injured in bear attack | अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देअस्वलाच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर जखमीलाठ्याकाठ्या, दगड मारून अस्वलाला हुसकावले

आंबोली : सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ चिखलवाळ बेरडकी या दुर्गम वाडी मधील नागेश रेमु नाईक (५२) यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. नागेश हे आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असता सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास अचानक पणे नाईक यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.

अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे गडबडलेल्या नाईक यांनी आरडाओरड सुरू केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करत असलेले विठ्ठल नाईक व भरत नाईक हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी लाठ्याकाठ्या व दगड मारून त्या अस्वलाला हुसकावून लावले. त्यामुळे फार काही गंभीर दुखापत न होता नाईक बालंबाल बचावले.

याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर तत्काळ वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिकेसह पोहोचले व नाईक यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले.

आंबोली चौकुळ परिसरामध्ये दरवर्षी अस्वले माणसांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे जंगलात जाताना अस्वल ज्या भागांमध्ये जास्त वावरत असतात त्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन निसर्गप्रेमी यांनी केले आहे.

Web Title: Adults seriously injured in bear attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.