संधीचा फायदा जनतेसाठी

By admin | Published: December 17, 2014 09:59 PM2014-12-17T21:59:08+5:302014-12-17T22:54:59+5:30

दिनेश साळगावकर : पक्षबांधणीसाठी काम करणार

The advantage of opportunity is to the public | संधीचा फायदा जनतेसाठी

संधीचा फायदा जनतेसाठी

Next

कुडाळ : काहीजणांच्या मते कुडाळ तालुका काँगे्रसचे तालुकाध्यक्षपद हे जरी काटेरी मुकुट असले, तरी माझ्या मते तो काटेरी मुकुट नसून मला मिळालेली संधी आहे. या संधीचा फायदा मी जनतेसाठी व पक्षबांधणीसाठी करणार असल्याचे वक्त व्य काँगे्रसचे नूतन तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर यांनी केले. यापुढे निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कुडाळ तालुका काँग्रेसच्या नूतन तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश साळगावकर यांची निवड केली. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साळगावकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे संजय पडते, अस्मिता बांदेकर, आनंद शिरवलकर, विकास कुडाळकर, माजी तालुकाध्यक्ष प्र्रकाश मोर्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, प्रसाद पोईपकर, राकेश कांदे आदी उपस्थित होते.
यावेळी साळगावकर म्हणाले, लोकसभा व विधानसभेतील पराभवामुळे आम्ही १० वर्षे मागे आलो असून पुन्हा शुन्यातून सुरुवात करणार आहोत. ही सुरुवात करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्षसंघटना मजबूत करणार आहोत. पक्षाचे आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी व कुडाळातील पदाधिकारी व नेते या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे, ती सर्वांना बरोबर घेऊन समर्थपणे पेलणार आहे, असा विश्वास साळगावकर यांनी व्यक्त केला.
या तालुक्यातील आकारीपड, वनसंज्ञा, हत्तीप्रश्न तसेच इतर प्रश्न समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांकडून योग्य न्याय न मिळाल्यास वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिनेश साळगावकर यांनी दिला. (प्रतिनिधी)

स्थानिक स्वराज्य संस्थेत आमचीच सत्ता
जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्ह्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता असून याचा उपयोग जनतेच्या विकासासाठी करणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.
चतुर्थी सणात धूप, अगरबत्ती वाटून जनेतला भावनिक बंधनात टाकून विजय मिळविणारे आमदार वैभव नाईक हत्तीप्रश्नी गप्प का, असा सवाल साळगावकर यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी भाजप पक्ष विकासाच्या बढाया मारीत असून विकास कोणता करणार, ते मात्र अजून उघड केलेले नाही. त्यामुळे त्यांनी बढाया मारू नये.
या जिल्ह्यात विकास फक्त नारायण राणे यांनीच केला असून त्यांनी केलेला विकास टिकविण्याचे कामच सत्ताधाऱ्यांनी करून दाखवावे.

Web Title: The advantage of opportunity is to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.