सावधान! झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ बघताय? आरोग्यावर 'हा' होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:43 PM2022-02-28T12:43:49+5:302022-02-28T12:53:02+5:30

मोबाइलवर सतत सोशल मीडिया पाहण्याच्या सवयीचा विपरीत परिणाम

Adverse effects of the habit of constantly watching social media on mobile | सावधान! झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ बघताय? आरोग्यावर 'हा' होतोय परिणाम

सावधान! झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ बघताय? आरोग्यावर 'हा' होतोय परिणाम

Next

सुधीर राणे

कणकवली : सध्याच्या धावपळीच्या युगात  अनेकांच्या जीवनात मोबाइल ही  अत्यावश्यक बाब बनली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणात असतानाही तो सोबतच असतो. मोबाइलवर सतत सोशल मीडिया पाहण्याच्या सवयीचा विपरीत परिणाम हा अनेकांच्या झोपेवर होत आहे.

त्यामुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडत आहे. झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ पाहणे टाळणे आवश्यक आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या हाती मोबाइल आला आहे.

अनेक व्यक्तींना मोबाइल पाहत लोळण्याची सवय असते. तशाच अवस्थेत झोपही लागते. पण फोन चालूच असतो. मध्येच नोटिफिकेशन वाजल्यास खडबडून जाग येते. अनेकांना झोपेत मध्येच उठून उगीचच सोशल मीडिया बघण्याची सवय असते.

दिवसभर मोबाइल वापरूनसुध्दा रात्री झोपताना मोबाइल हातात घेतला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होऊ शकत नाही. मोबाइलमुळे सतत थकवा जाणवतो. उत्साह राहत नसल्याने त्याचा कामावरही परिणाम होत असतो.

२० मिनिटांचा घ्या ब्रेक!

नोकरी, व्यवसाय करत असताना अनेकांना मोबाइल किंवा कॉम्प्युटरचा वापर सारखा करावा लागतो. त्यांनी दर २० मिनिटांनी मोबाइलपासून पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. यावेळेस तोंडावर पाणी मारणे, थोडे चालणे अशा सवयी लावून घ्याव्यात.

झोपेचे दोन-चार तास मोबाइलवर !

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरास कमीत कमी सहा तास झोप आवश्यक असते. पुरेशी झोप शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र, आता प्रत्येक व्यक्ती रात्री मनोरंजन म्हणून मोबाइल हाती घेऊन बसतो. एकदा मोबाइल हाती घेतला की दोन ते चार तास मोबाइलमध्ये गुंतून राहावे लागते. त्यामुळे झोपेचे दोन ते चार तास मोबाइलवरच जातात.

रात्री १० वाजल्यापासून मोबाइल दूर ठेवलेलाच उत्तम. मात्र, कामानिमित्त मोबाइलचा वापर करावाच लागत असेल, तरी ऑडियो-व्हिडिओ पाहण्याचे टाळावे. झोपतेवेळी मात्र, मोबाइल शरीरापासून दूर ठेवावा. मोबाइलचा डोळे तसेच मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. झोप पुरेशी न झाल्याने दुसऱ्या दिवशी उत्साह राहत नाही. त्यामुळे मोबाइलचा वापर कमी करावा.हे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. -आशा ठाकूर,  मनोविकारतज्ज्ञ.

Web Title: Adverse effects of the habit of constantly watching social media on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.