केसरकरांच्या शहरात अफू, गांजा, जुगाराचे अड्डे, परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 04:05 PM2018-11-10T16:05:29+5:302018-11-10T16:11:12+5:30

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

Afoo, Ganja, Gambling in Sindhudurg | केसरकरांच्या शहरात अफू, गांजा, जुगाराचे अड्डे, परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

केसरकरांच्या शहरात अफू, गांजा, जुगाराचे अड्डे, परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

Next
ठळक मुद्देगृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आपल्या मतदारसंघात लक्ष नाही.पालकमंत्र्याच्या सावंतवाडीतच अफू, गांजा तसेच जुगार जोरात असल्याचा आरोप ही उपरकर यांनी केलाजिल्ह्यात केवळ घोषणाबाजी करण्याचे काम पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर करत आहेत.

सावंतवाडी - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. पालकमंत्र्याच्या सावंतवाडीतच अफू, गांजा तसेच जुगार जोरात असल्याचा आरोप ही उपरकर यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, अमित इब्रामपुरकर, सुधीर राऊळ, राजू कासकर, अनिल केसरकर, ललिता नाईक, कृष्णा गावडे, ओंकार कुडतरकर, गीता पाटेकर, संकेत मयेकर, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते. 

उपरकर म्हणाले, जिल्ह्यात गेले काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काल येथील नरेंद्र डोंगरावर तेथील कुंड्या व बेंच मोडतोड करण्याचा प्रकार झाला होता. हा सर्व प्रकार त्याठिकाणी परिसरात बसल्या जाणाऱ्या परप्रांतियांकडून झाला याची अधिकृत माहिती व पुरावे आपल्याकडे आहेत. नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या उद्यानात गांजा अफू आदी अमली पदार्थाचा मोठा वापर केला जातो. त्या ठिकाणी मटका जुगार खेळतो. त्यातून परप्रांतीयांकडून हा प्रकार झाल्याची आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकारची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी आम्ही मनसेकडून करणार आहोत.

उपरकर म्हणाले जिल्ह्यात केवळ घोषणाबाजी करण्याचे काम पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर करत आहेत. राज्यमंत्री असूनसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध्य धंदे दारू वाहतूक अमली पदार्थ जुगार मटका आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केसरकर अपयशी ठरले आहेत. राणे यांच्या काळात मनसेने त्यांच्या विरोधात पालकमंत्री हटाव असे आंदोलन केले होते. आता त्याची पुनरावृत्ती मनसे करणार आहे. 

Web Title: Afoo, Ganja, Gambling in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.