३२ वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी सांगितले आपले अनुभव...८८-९० नंतर ते भेटले मालवणात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 02:24 PM2018-11-22T14:24:25+5:302018-11-22T14:27:11+5:30

येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक महाविद्यालयाच्या १९८८ ते १९९० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुडाळ येथील ड्रिमलँड गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. गतवर्षी घेतलेल्या यशस्वी मेळाव्यानंतर सलग दुसºया

After 32 years the students said their experience ... 88-90 later they met in the caravan ... | ३२ वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी सांगितले आपले अनुभव...८८-९० नंतर ते भेटले मालवणात...

मालवण येथील टोपीवाला अध्यापक महाविद्यालयाच्या १९८८ ते १९९० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुडाळ येथे पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमालवण अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावागतवर्षी घेतलेल्या यशस्वी मेळाव्यानंतर सलग दुसºया वर्षी या स्नेहमेळाव्याचे आयोजन

मालवण : येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक महाविद्यालयाच्या १९८८ ते १९९० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुडाळ येथील ड्रिमलँड गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. गतवर्षी घेतलेल्या यशस्वी मेळाव्यानंतर सलग दुसºया वर्षी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात ‘श्रीरामा तू दैवत माझे’ या प्रार्थनेने झाली. स्नेहमेळाव्यानिमित्त जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी गेल्या ३२ वर्षांतील आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.

दुपारी भोजनानंतर मोकळ्या गप्पा व सुनंदा सावंत-कांबळे यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांच्या ‘तावडन आजी’ या कवितेला सर्वांनी भरभरून दाद दिली. यावेळी उदय सर्पे यांनीही आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाला माजी प्राचार्य अविनाश खानोलकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी छाया पावसकर, श्रीकृष्ण नानचे, शिवराज सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. या  स्नेहमेळाव्याला संजय गोसावी, लक्ष्मण धुरी, पंढरीनाथ करवडकर, राजेंद्र परब, गणपत शिरोडकर, संजय परुळेकर, संजय कदम, श्रीकृष्ण नानचे, शिवराज सावंत, उदय सर्पे, शुभांगी पावसकर-आचरेकर, सुनंदा सावंत-कांबळे, राजश्री कर्पे-नारकर, शुभांगी घाडीगांवकर-वारंग, प्रज्ञा कांबळी-वराडकर, राजश्री परब-सावंत, विद्या सांडव-रेडकर, सुमती पोकळे-नानचे, करुणा ताम्हणकर-निकम, रत्नमाला आंगणे-लाड, हेमलता गोसावी, वीणा गोसावी, वृंदा अणावकर-तळवणेकर, राजश्री कदम-सर्पे, निर्मला कदम-तांबे, मंगल आरोलकर-पेडणेकर, शुभांगी करावडे-येरम, मेघना तवटे-आळवे, सुलभा देसाई, मेधा पाटकर-साटेलकर आदी उपस्थित होते.

 

 

Attachments area

Web Title: After 32 years the students said their experience ... 88-90 later they met in the caravan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.