राजीनाम्यानंतर प्रभूंनी रेल भवनाकडे फिरवली होती पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:00 AM2017-09-05T00:00:07+5:302017-09-05T00:00:16+5:30
अनंत जाधव
सावंतवाडी, दि. 4 - एरव्ही अठरा-अठरा तास रेल भवनात बसून देशाच्या रेल्वेत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे सिंधुदुर्गचे सुपूत्र सुरेश प्रभू यांनी उत्तर प्रदेशातील सततच्या दोन अपघातानंतर रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्या दिवसापासूनच प्रभूंनी रेल भवनात जाण्याचे बंद केले होते. तसेच गणेश चतुर्थीच्या काळात मालवण दौ-यावर असतानाही त्यांनी रेल्वेचा कोणता ही मोठा लवाजमा सोबत बाळगला नव्हता. त्यावेळीच प्रभूंचे रेल्वेमंत्रिपद धोक्यात आल्याचे सर्वजण जाणून होते. पण त्यावर प्रभू मात्र कार्यकर्त्यांशी काही बोलत नव्हते. पण त्यांची देहबोली सर्व काही सांगून जात होती. मात्र यावर रविवारच्या खांदेपालटात शिक्कामोर्तब झाले आणि प्रभूंच्या पदरात उद्योग व व्यापार खाते पडले.
केंद्रात भाजपाप्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिले एक वर्ष देशाला रेल्वेमंत्री मिळत नव्हता. मात्र दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना सकाळी भाजपा पक्षात घेतले आणि लागलीच मंत्रिपदाची शपथ देत त्यांच्या डोक्यावर रेल्वे मंत्रालयाचा काटेरी मुकुट घातला. प्रभूंनीही तो समर्थपणे पेलला. रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल घडवायच्या उद्देशाने ते देशात कमी तर दिल्लीतील रेल भवनात अधिक दिसायचे. रेल्वेमध्ये बाहेरची गुंतणवूक आणली तर रेल्वे कधीही तोट्यात जाणार नाही अशी त्यांनी मनाशी पक्की खुणगाठ बांधली होती. म्हणूनच ते सतत रेल्वेत बदल घडवून आणण्याच्या मागे होते. त्यांनी आपल्या रेल्वेमंत्री पदाच्या काळात अनेक न