Maharashtra Vidhan Sabha 2019 : पारकर यांनी घेतला अर्ज मागे, नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत लढाई रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:46 PM2019-10-07T13:46:22+5:302019-10-07T16:41:43+5:30

कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे  आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे.

After Sandesh Parker's nomination papers, Satish Sawant will contest the match against Nitesh Rane | Maharashtra Vidhan Sabha 2019 : पारकर यांनी घेतला अर्ज मागे, नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत लढाई रंगणार

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पारकर यांनी घेतला अर्ज मागे, नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत लढाई रंगणार

Next
ठळक मुद्देसंदेश पारकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत सामना रंगणार

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे  आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेना नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. यासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह खुद्द शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी त्यांच्या घरी ठाण मांडले होते. संदेश पारकर यांना शिवसेनेत बड्या पदावर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अखेर पारकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या घडामोडीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते.

एकेकाळचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक असलेल्या सावंत यांनी प्रथम अपक्ष व त्यानंतर शिवसेनेत जाऊन भाजपाचे उमेदवार तथा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.त्यामुळे आता कणकवली मतदार संघात सद्यस्थितीला नीतेश राणे यांच्याविरुद्ध सतिश सावंत असा सामना रंगणार असल्याने काटे की टक्कर होणार आहे. 

Web Title: After Sandesh Parker's nomination papers, Satish Sawant will contest the match against Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.