एकवीस वर्षांनंतर देव्हारे येथे महाशिवरात्र साजरी
By admin | Published: February 19, 2015 10:49 PM2015-02-19T22:49:31+5:302015-02-19T23:36:54+5:30
देवरहाटीतील मंदिर : १९९४ साली झाला होता उत्सव
देव्हारे : तब्बल एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा देव्हारे येथील स्वयंभू शिव मंदिरात महाशिवरात्रौत्सव उत्साहाने पार पडला़
देव्हारे येथे देवरहाटीमधे पुरातन असे स्वयंभू शंंकर मंदिर आहे़ रस्त्यालगत असलेल्या या जागृत शिव मंदिरामधे भक्तांची वर्दळ असते़ या स्वयंभू मंदिरामधे १९९४ साली ग्रामस्थांनी प्रथम मोठया स्वरूपामधे कार्यक्रम केला होता़ यावेळी जत्रेचे अयोजन करण्यात आले होते़ मात्र, पुन्हा असा कार्यक्रम येथे झाला नव्हता. त्यानंतर आता एकवीस वर्षानंतर देव्हारे स्वयंभू मंदिर कार्यकारणीच्या माध्यमातून देव्हारे येथे मोठ्या स्वरूपामधे उत्सव साजरा करण्यात आला़ तालुक्यामधे देव्हारे येथे एकमेव स्वयंभूचे जागृत देवस्थान असल्याने, या ठिकाणी सकाळपासूनच देव्हारे परिसरासह मंडणगड तालुक्यातील भक्तांची दर्र्शनासाठी मोठी वर्दळ होती. त्याचबरोबर येथील मंडळाने क्रिकेट सामन्यांचे आयोजन, महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन केले होते़ तर संध्याकाळी येथे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ त्यासाठी संजय पंदीरकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी देव्हारे पूर्ववाडी, उत्तरवाडी व दक्षिणवाडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळानी विशेष सहकार्य केले. (वार्ताहर)
मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथील स्वयंभू शिव मंदिरात २१ वषार्नंतर महाशिवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात आला. देव्हारे स्वयंभू मंदिर कार्यकारिणीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. देव्हारे, पूर्ववाडी, उत्तरवाडी व दक्षिणवाडी येथील मंडळींनी विशेष सहकार्य केले.