कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:39 PM2020-09-17T15:39:02+5:302020-09-17T15:44:02+5:30

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

Agriculture Committee Meeting: Protest against the working of the Guardian Minister | कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

Next
ठळक मुद्देकृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेधरणजित देसाई यांचा आरोप, सिंधुदुर्गला कोणी वाली नसल्याची टीका

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

उदय सामंत हे रत्नागिरीचे असल्यामुळे व रायगड जिल्ह्यात तटकरे असल्यामुळे तेथे भरघोस निधी मिळतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले.

जिल्हा परिषद कृषी समिती सभा आॅनलाईनद्वारे बुधवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनील चव्हाण, सदस्य गटनेते रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला या महिन्यात निधन झालेले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे आई-वडील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. जुलै महिन्यात याची घोषणाही झाली. मात्र, यापैकी २५ लाखसुद्धा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. आपल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार, एक खासदार असूनही जिल्ह्याला वाली कोणीही नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला. सुधीर नकाशे यांनीही आगपाखड केली.

...तर तुमची पळता भुई थोडी होईल

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांना सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळे विरूद्ध अमरसेन असे चित्र पहावयास मिळाले. जिल्हा रुग्णालयाच्या एका विषयावर गटनेते रणजित देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे. कित्येक दिवस चादरी बदलल्या जात नाहीत. स्वच्छता नाही. यापेक्षाही भयाण परिस्थिती आहे. सगळेच बोलायला गेलो तर तुमची पळता भुई थोडी होईल अशा शब्दांत सदस्य सावंत यांना इशारा दिला.

Web Title: Agriculture Committee Meeting: Protest against the working of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.