बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर
By admin | Published: March 25, 2016 11:19 PM2016-03-25T23:19:02+5:302016-03-25T23:38:04+5:30
६२४६ बंधारे पूर्ण : दहा हजारांचे होते उद्दिष्ट, तालुक्यांची आकडेवारी समाधानकारक
गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी -भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या कच्चे व वनराईच्या १० हजार बंधाऱ्यांपैकी ६२४६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. उद्दिष्टाच्या ६२ टक्केच बंधारे घातल्याने आगामी काळात पाणी प्रश्न हा गंभीर होणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभाग मात्र बंधारे बांधण्यात अपयशी ठरला असून २२०० पैकी केवळ ५०६ बंधारे बांधले आहेत.
गेल्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा शेकडोपटीने पाऊस कमी झाल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पोहोचणार ही शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य तालुकास्तरावर, कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला विभागून दिले होते.
त्यानुसार आजअखेरपर्यंत यापैकी केवळ ६२४६ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उद्दिष्टपूर्ती केवळ ६२ टक्केच असल्याने मे अखेरीस जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. सामाजिक वनीकरण विभागाला ३०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. मात्र, या विभागानेही केवळ ९५ बंधारे बांधण्यात समाधान मानले. उद्दिष्टाच्या केवळ ३१.६७ टक्के काम पूर्ण केले. त्यामुळे या विभागाची अनास्था दिसून आली.
कणकवली१२७५८८२
कुडाळ१२००८५४
दोडामार्ग४५०४१३
वेंगुर्ला६००४१९
मालवण१२००८११
देवगड१०५०९५८
सावंतवाडी१२७५१००८
वैभववाडी४५०३००
एकूण७५००५६४५
बंधाऱ्यांचे काम समाधानकारक
७५०० बंधाऱ्यांपैकी ५६४५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. याची ७५.२७ टक्केवारी आहे. बंधाऱ्यांची एकूण टक्केवारी पाहता ६२.४६ टक्के आहे. सामाजिक वनीकरण व कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळेही टक्केवारी कमी झाली आहे.
या दोन विभागांनी बंधाऱ्याच्या कामात प्रगती केली असली तर या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होणार होती. आता ओहोळ, नदी या ठिकाणचा पाण्याचा प्रवाह थांबला असून आता बंधारे घालणे थांबले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर गेला आहे.
राज्य शासनाचा कृषी विभाग कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमीच चर्चेत असतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाला २२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. जेणेकरून पाण्याची पातळी वाढावी व फळ पीक व शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा.
मात्र, या उद्दिष्टापैकी केवळ ५०६ बंधारेच या विभागाने बांधून पूर्ण केले आहेत.