रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Published: January 14, 2015 10:04 PM2015-01-14T22:04:05+5:302015-01-14T23:51:55+5:30
जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आमरण उपोषण करण्यास भाग पाडू नये. आम्हा प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळवून द्यावी,
ओरोस : रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्यावतीने उपोषणास बसणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे अध्यक्ष सदानंद सावंत यांनी ओरोस रवळनाथ मंदिर येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत जाहीर केले.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कोकण रेल्वेचे व्यवस्थापक भानुप्रसाद तायल यांनी प्रकल्पग्रस्तांवर थोडीशी सहानुभूती दाखविल्यास सर्व प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे प्रशासनामध्ये नोकरी व व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो तसेच सर्व प्रकल्पग्रस्तांना विनाअट कोकण रेल्वे प्रशासनात नोकरी उपलब्ध होऊ शकते. सन २००४ मध्ये काही प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे प्रशासनाने नोकऱ्या, व्यवसाय दिले पण नंतरच्या काळात त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आमरण उपोषण करण्यास भाग पाडू नये. आम्हा प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळवून द्यावी, अशी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडे मागणी केली आहे.
यावेळी ओरोस रवळनाथ मंदिर येथील झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत अध्यक्ष सदासेन सावंत, सुभाष दळवी, कृष्णा कामतेकर, विशाल परब, वैभव तेंडोलकर, मनोज परब तसेच अनेक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)