आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिरात उद्यापासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवापर्यंत बंद    

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 2, 2024 03:44 PM2024-12-02T15:44:19+5:302024-12-02T15:44:53+5:30

मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर २०२४ ते सन  २०२५ या वर्षामध्ये होणाऱ्या आंगणे ...

all rituals such as filling of OT, placing of coconuts, taking of vows etc. will be closed from tomorrow In Anganewadi Shree Devi Bharadi temple | आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिरात उद्यापासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवापर्यंत बंद    

आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिरात उद्यापासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवापर्यंत बंद    

मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर २०२४ ते सन  २०२५ या वर्षामध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या ऊत्सवापर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधीमुळे ओटी भरणे, साडी चोळी(खण), नारळ (श्रीफळ) ठेवणे, नवस फेडणे, गोड पदार्थ ठेवणे, गाऱ्हाणी घालणे." इत्यादी  सर्व विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत.
        
त्यामुळे कोणतेही पुजा विधी साहित्य किंवा नवस फेडीचे साहित्य भाविकांनी मंदिरात दर्शनास येताना आणू नये. त्याचा स्वीकार मंदिरात केला जाणार नाही. आई भराडी मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: all rituals such as filling of OT, placing of coconuts, taking of vows etc. will be closed from tomorrow In Anganewadi Shree Devi Bharadi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.