इंटकच्या राज्यव्यापी संपाला सर्वांचा पाठिंबा
By admin | Published: December 16, 2015 11:51 PM2015-12-16T23:51:17+5:302015-12-17T01:24:46+5:30
अशोक राणे, एच. बी. रावराणेंची माहिती : कणकवलीतील गेट मिटींगमध्ये विविध विषयांवर चर्चा
कणकवली : महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या कणकवली येथे झालेल्या गेट मीटिंग मध्ये १७ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपाला सर्वांनी पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे व सचिव एच. बी. रावराणे यांनी दिली .याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इंटकच्या सिंधुदुर्ग विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी गेट मीटिंग झाली. यावेळी विविध विषय चर्चिले गेले. सन २०१२ ते १६ चा करार मोडीत काडुन तो २५ टक्के वाढीचा करण्यात यावा. यासाठी १७ डिसेंबरला संप पुकारण्याबाबत प्रशासनाला नोटिस देण्यात आली आहे.
देशात सर्वात कमी पगार म्हणून एस.टी. महामंडळाची ख्याती आहे. आतापर्यंत मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मान्यतेच्या नावाखाली कामगारांचे कसे आर्थिक नुकसान केले, याची माहिती यावेळी देण्यात आली. कनिष्ठ वेतन श्र्रेणी कर्मचा?्याना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणीचा फायदा द्यावा. २००० ते १२ पर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेली आहे. त्यांना नियमित वेतनश्रेणी देऊन वेतन निश्चिति करण्यात यावी. चालक, वाहक रजा व्यवस्थापन संगणकीकृत करण्यात यावे. महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सोई, सवलती देण्यात याव्यात,अशा मागण्यांचा समावेश आहे.
हा संप कायदेशीर असून संपाची नोटीस सर्व खात्याना देण्यात आलेली आहे. कामगार संघटनेचे लोक कामगाराचि दिशाभूल करून संपात उतरु नये, असे आवाहन करीत आहेत. परंतु सर्व कामगार सुशिक्षित असून अशा भुलथापाना ते बळी पडणार नाही. त्यामुळे सर्व कामगार संपात सहभागी होणार असून संप यशस्वी करण्यात येईल, असे ही या पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)