जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक यांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 03:57 PM2021-04-01T15:57:49+5:302021-04-01T15:59:46+5:30
corona virus sindhudurg : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. त्याअर्थी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड - 19 चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
सिंधुदुर्ग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. त्याअर्थी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड - 19 चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक यांनी स्वतः तसेच त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, कामगार यांनी दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे येऊन आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे आरटीपीसीआर टेस्टची विनामुल्य, मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथून प्राप्त झालेला अहवाल व्यापारी, कामगार यांनी स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे. दि. 15 एप्रिल 2021 अखेर ज्या व्यापारी, कामगार यांनी तपासणी करून अहवाल प्राप्त करून न घेतल्याचे आढळून येईल त्यांची आस्थापना, दुकान जिल्हाधिकारी कार्यालयाकडील पुढील आदेशपावेतो बंद करण्यात येईल. असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.